ETV Bharat / bharat

आंदोलक शेतकरी घरी जाणार नाहीत; काँग्रेसचा त्यांना पूर्ण पाठिंबा - राहुल गांधी

author img

By

Published : Jan 29, 2021, 8:44 PM IST

"शेतकरी कशासाठी आंदोलन करत आहे हे तर स्पष्टच आहे. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या पोटावर पाय देण्याचे काम करत आहे. तसेच, केंद्राच्या धोरणांमुळे महागाई वाढून मध्यमवर्गाचे कंबरडेही मोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. सरकारने असे आजिबात समजू नये, की शेतकरी घरी जातील. केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधत तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे" असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi assures full support to protesting farmers
आंदोलक शेतकरी घरी जाणार नाहीत; काँग्रेसचा त्यांना पूर्ण पाठिंबा - राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तसेच, सरकारने असे आजिबात गृहित धरु नये की आंदोलक शेतकरी आपल्या घरी परत जातील, असा इशाराही त्यांनी दिला. ते दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकरी घरी जाणार नाहीत, केंद्राने तोडगा काढावा..

"शेतकरी कशासाठी आंदोलन करत आहे हे तर स्पष्टच आहे. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या पोटावर पाय देण्याचे काम करत आहे. तसेच, केंद्राच्या धोरणांमुळे महागाई वाढून मध्यमवर्गाचे कंबरडेही मोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. सरकारने असे आजिबात समजू नये, की शेतकरी घरी जातील. केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधत तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे" असे राहुल गांधी म्हणाले.

तिन्ही कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान..

"सध्या लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांपैकी पहिल्या कायद्यामुळे मंडई हा प्रकार नष्ट होईल, तर दुसऱ्या कायद्यामुळे तीन-चार उद्योजकांना फायदा होणार आहे; तसेच तिसऱ्या कायद्यामुळे शेतकऱ्याचा न्यायालयात जाण्याचा हक्कही हिरावला जाण्याची शक्यता आहे" असे राहुल गांधींनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्पष्ट केले.

'त्या' आंदोलकांना लाल किल्ल्यात का जाऊ दिले?

ट्रॅक्टर परेडच्या वेळी झालेल्या हिंसाचाराबाबत बोलताना गांधी म्हणाले, की लाल किल्ल्यामध्ये शिरणाऱ्या आंदोलकांना थांबवण्यात का आले नाही? त्यांना आत जाण्याची परवानगी कोणी आणि का दिली? या आंदोलकांना आत जाण्याची परवानगी देण्यामागे काय उद्दिष्ट होते, असे तुम्ही अमित शाहांना विचारा.

हेही वाचा : दिल्लीमध्ये इस्राईलच्या दूतावासाबाहेर स्फोट; मुंबईमध्ये अलर्ट जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.