ETV Bharat / bharat

'कोरोनाला हलक्यात घेऊ नका, लोकांनी मास्क घालण्याची गरज'

'मास्क घालण्याचे आणि एकमेकांत अंतर ठेवण्याच्या नियमांचे सर्वांनी पालन करावं, अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. सुरक्षित आणि आरोग्यदायी रहा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोरोनाला हलक्यात घेऊ नका, असे मोदी म्हणाले.

PM Modi
पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Sep 10, 2020, 4:32 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींना आज(गुरुवार) देशवासियांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची विनंती केली. सोबतच कोरोनाला हलक्यात घेऊ नका, असं आवाहनही त्यांनी केले. जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत कोरोना नियमावली पाळण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केले.

'मास्क घालण्याचे आणि एकमेकांत अंतर ठेवण्याच्या नियमांचे सर्वांनी पालन करावं, अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. सुरक्षित आणि आरोग्यदायी रहा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोरोनाला हलक्यात घेऊ नका', असे मोदी म्हणाले.

जोपर्यंत वैज्ञानिक कोरोनावर लस तयार करत नाही, तोपर्यंत 'सामाजिक लस' तुमचं कोरोनापासून संरक्षण करेल, हा एकच पर्याय आहे, असे मोदी म्हणाले. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या उद्घाटनावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. या सोबतच मोदींनी बिहार राज्यात अनेक कार्यक्रमांचे उद्धाटन केले. सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

भारतात मागील २४ तासांत सर्वात जास्त ९७ हजार ७३५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून १ हजार १७२ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण रुग्णांचा आकडा ४४ लाखांच्या पुढे गेला आहे. तर ७५ हजार ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. ३४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.