हैदराबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चाहत्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. बुसा कृष्णा असे त्या चाहत्याचे नाव असून तो तेलंगाणा राज्यातील जनगाव येथील रहिवाशी होता. त्याने आपल्या घरात ट्रम्प यांचा 6 फूट उंच असा हा पुतळा उभारला होता. त्या पुतळ्याची तो देवासारखी पूजा करायचा. यामुळे ते चांगलाच चर्चत आला होता.
बुसा कृष्णा असे त्यांचे नाव होते. मात्र, त्यांना ट्रम्प कृष्णा या नावाने गावकरी ओळखत. बुसा कृष्णा दररोज ट्रम्प यांच्या पुतळ्याची पूजा करत. तसेच दुधाचा अभिषेकही करत. जेव्हा ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा ट्रम्प यांना भेटण्यासाठी त्यांनी भारत सरकारकडे विनंती केली होती. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही.
भारत-अमेरिकेदरम्यानचे संबंध मजबूत व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. ट्रम्प यांच्या दीर्घ आयुष्यासाठी ते आठवड्यातून प्रत्येक शुक्रवारी उपवास पकडायचे. तसेच कोणतेही काम करण्यापूर्वी त्यांच्या फोटोला प्रार्थना करायचे. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.