ETV Bharat / bharat

दाऊद इब्राहिम आमच्या कॅरेबियन बेटाचा नागरिक नाही - डोमिनिका सरकार - कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिका न्यूज

1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना जबाबदार असल्यामुळे भारताला कायद्याच्या चौकटीपुढे आणण्यासाठी दाऊद इब्राहिम हवा आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पाकिस्तानने मात्र आतापर्यंत दाऊद इब्राहिमला आश्रय दिल्याचे नाकारले आहे. इस्लामाबादने मंजूर केलेल्या 88 दहशतवाद्यांच्या यादीत कागदपत्रावरील त्याचा पत्ता व्हाइट हाऊस, कराची असा आहे.

दाऊद इब्राहिम न्यूज
दाऊद इब्राहिम न्यूज
author img

By

Published : Aug 30, 2020, 5:47 PM IST

नवी दिल्ली - 'अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम कधीच या कॅरेबियन बेटाचा नागरिक झाला नाही,' असे डोमिनिका सरकारने म्हटले आहे. दाऊद या देशाचा नागरिक असल्याचे किंवा अशा प्रकारचे इतर कोणतेही वृत्त कोणत्या प्रकाशकाने किंवा माध्यमाने दिले असल्याचे ते धादांत खोटे आहे, असे येथील सरकारने म्हटले आहे.

'दाऊद इब्राहिम कासकर हा कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिकाचा नागरिक नाही, तसेच त्याला सिटीझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम किंवा इतर कोणत्याही माध्यमातून नागरिकत्व दिले गेलेले नाही.' असे डोमिनिका सरकारने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच, अशा प्रकारचे वृत्त कोणी प्रसिद्ध केले असल्यास ते खोटे असल्याचेही म्हटले आहे.

'गुंतवणूक कार्यक्रमांद्वारे दिल्या जाणाऱ्या नागरिकता अखंड राखणे ही गुंतवणूक पथकाची जबाबदारी आहे. ते ती जबाबदारी तपासणी कार्यपद्धतींचा वापर करून व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. यासाठी बहुस्तरीय प्रणाली लागू करण्यात आली आहे. यासाठी युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडममधील प्रतिष्ठित, उच्च-स्तरीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मदत घेतली जाते,' असे या निवेदनात पुढे म्हटले आहे.

1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना जबाबदार असल्यामुळे भारताला कायद्याच्या चौकटीपुढे आणण्यासाठी दाऊद इब्राहिम हवा आहे. या स्फोटांमध्ये अनेक लोक ठार आणि जखमी झाले होते. भारताने दाऊद इब्राहिमला स्वाधीन करण्याविषयी पाकिस्तानला अनेकदा बजावले आहे.

पाकिस्तानने मात्र आतापर्यंत दाऊद इब्राहिमला आश्रय दिल्याचे नाकारले आहे. तथापि, अलीकडेच पाक सरकारच्या एका कागदपत्रात दाऊद इब्राहिमचे स्थान उघडकीस आले होते. हा दस्तऐवज इस्लामाबादने मंजूर केलेल्या 88 दहशतवाद्यांच्या यादीशी संबंधित होता. कागदपत्रावरील त्याचा पत्ता व्हाइट हाऊस, कराची असा आहे.

ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या फायनान्शियल अ‌ॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) बैठकीपूर्वी पाकने ही यादी जाहीर केली. पाकच्या भूमीवरील दहशतवादाला आळा घालण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत तर, पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले जाईल. यामुळे वरवर का होईना पाकिस्तानकडून काही पावले उचलली जात आहेत. जागतिक संघटनेने या देशाला दहशतवादाला होणाऱ्या अर्थपुरवठ्याविरोधात कारवाई करण्यास वारंवार सांगितले आहे. जून 2018 पासून हा देश एफएटीएफ 'करड्या यादी'मध्ये (ग्रे लिस्ट) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.