ETV Bharat / bharat

'तू कोरोना आहेस, घरातून चालती हो..!' लॉकडाऊन काळात घरगुती हिंसाचारात वाढ

author img

By

Published : Apr 2, 2020, 7:32 PM IST

Updated : Apr 2, 2020, 7:38 PM IST

24 मार्चपासून 1 एप्रिलपर्यंत महिला आयोगाकडे 69 तक्रारी आल्या असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. एक किंवा दोन तक्रारी रोज ई-मेलद्वारे येत आहेत.

घरगुती हिंसाचार
घरगुती हिंसाचार

नवी दिल्ली - भारतात कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. संचारबंदीमुळे सर्व नागरिक घरामध्ये कोंडले गेले आहेत. मात्र, 24 तारखेला लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशामध्ये घरगुती हिंसाचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे. काही हिंसाचाराच्या घटनांमध्ये पती पत्नीला कोव्हिड-19 म्हणून हिणवत असल्याचे समोर आले आहे, असे आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले.

24 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत महिला आयोगाकडे 69 तक्रारी आल्या असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. एक किंवा दोन तक्रारी रोज मला ई-मेलद्वारे येत आहेत. तसेच आयोगातील कर्मचाऱ्यांच्या ई-मेल आयडीवर, वैयक्तिक व्हॉट्सअ‌ॅप नंबरवर आणि कार्यालयाच्या क्रमांकावरही घरगुती हिंसाचारावर तक्रारी येत आहेत, असे शर्मा यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले.

संचारबंदीच्या काळात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांच्या तक्रारी येत आहेत. सगळीकडे बंद असल्यामुळे महिलांना पोलिसांकडेही मदतीसाठी जाता येत नाही. काही महिला पोलिसांकडेही जाण्यास तयार नाहीत. कारण दोन-तीन दिवसानंतर पती माघारी आल्यावर पुन्हा पत्नीवर अत्याचार करण्याची भीती महिलांमध्ये आहे. ही जरा वेगळीच अडचण आहे. संचारबंदी आधी नवरा बायकोत भांडण झाल्यावर महिला आपल्या आई-वडील किंवा नातेवाईकांकडे जाऊ शकत होती, मात्र, संचारबंदीमुळे तिला घराबाहेर पडता येत नाही, असे शर्मा म्हणाल्या.

लॉकडाऊनआधी महिला कुटुंबीयांकडे, जॉब करते त्या ठिकाणी किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकत होती. मात्र, बंद असल्यामुळे त्यांना अत्याचार करणाऱ्या पतीसोबतच राहावे लागत आहे, असे शर्मा म्हणाल्या.

नैनिताल येथील एका महिलेन पती अत्याचार करत असल्याची तक्रार आमच्याकडे केली आहे. या महिलेला घराच्याबाहेर पडता येत नाही. पती तिला सतत मारहाण करत आहे. मात्र, तिला दिल्लीत माहेरी येता येत नाही. त्यामुळे संचारबंदी काळात होस्टेल किंवा इतर जागी राहण्याची मागणी अत्याचारग्रस्त महिलेने केली आहे. पोलिसांकडे तक्रार करण्यासही ती घाबरत आहे. कारण जर पतीविरोधात तक्रार दाखल केली तर त्याच्या घरचे छळ करतील, अशी भीती तिला आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

दुसऱ्या एका तक्रारीबाबत सांगताना शर्मा म्हणाल्या, या महिलेला पती सतत मारहाण करत होता, तसेच तिला तू कोव्हिड-19 असल्याचे म्हणत हिणवले. काल मला पंजाबमधील मोहालीमधून एक फोन आला, या महिलेलाही तिचा पतीने मारहाण केली, आणि तू कोव्हिड-19 असल्याचे म्हणत हिणवले. तुझ्यामुळे मी अडचणीत आलो आहे. तु माझे घर सोडून जा, असे म्हणत महिलेला त्रास दिला.

महिला आयोग अशा तक्रारी हाताळत असून मी वैयक्तीकरित्या अत्याचारीत महिलांना फोन करत आहे. मी आणि माझे सहकारी 24 तास काम करत असून अशा घटना आढळून आल्या तर माध्यमांनी उचलून धराव्यात, असे आवाहन त्यांनी माध्यमांना केले.

Last Updated : Apr 2, 2020, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.