नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा बसावा, म्हणून संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यापूर्वीच देशातील विमानतळांवरून होणारी आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय विमानसेवाही बंद करण्यात आली होती. या सर्वांमध्येही काही स्थानिक विमान कंपन्या, कार्गो विमाने आणि भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मिळून तब्बल १५ टन वैद्यकीय वस्तू या देशभरात पोहचवल्या आहेत. २६ मार्च ते ३० मार्चदरम्यान एकूण ६२ विमानांनी हे साहित्य पोहोचवले आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मंगळवारी दिली.
-
The cargo essentially included COVID-19 related reagents, enzymes, medical equipment, testing kits & PPE, masks, gloves & other accessories of HLL & cargo requisitioned by State/UT Govts & postal packets.@MoHFW_INDIA @flyspicejet @IndiGo6E#IndiaFightsCorona
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The cargo essentially included COVID-19 related reagents, enzymes, medical equipment, testing kits & PPE, masks, gloves & other accessories of HLL & cargo requisitioned by State/UT Govts & postal packets.@MoHFW_INDIA @flyspicejet @IndiGo6E#IndiaFightsCorona
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 31, 2020The cargo essentially included COVID-19 related reagents, enzymes, medical equipment, testing kits & PPE, masks, gloves & other accessories of HLL & cargo requisitioned by State/UT Govts & postal packets.@MoHFW_INDIA @flyspicejet @IndiGo6E#IndiaFightsCorona
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 31, 2020
या विमानांमधून कोरोना विषाणूसंबंधी टेस्टिंग किट्स, वैद्यकीय साहित्य, औषधे, सुरक्षा साहित्य, मास्क, हातमोजे आणि इतर साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यात आले. २१ दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये ही वाहतूक सुरू रहावी, यासाठी विमान मंत्रालयाने एक समिती स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.
ही वाहतूक केंद्र आणि प्रवक्ता या माध्यमातून होत आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता या मुख्य केंद्रे, तर गुवाहाटी, दिब्रूगड, आगरतळा, ऐजवाल, इंफाळ, कोईंबतूर आणि तिरूअनंतपूरममध्ये प्रवक्ता केंद्रे उभारण्यात आली आहेत. २१ दिवसांच्या लॉकडाऊनदरम्यान आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. मात्र कार्गो सेवा, वैद्यकीय गरजेसाठीची विमानसेवा, एअरलिफ्ट ऑपरेशनसाठी विमानसेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
आतापर्यंत देशभरात सुमारे १३०० लोकांना कोरोनाची लागण झाली असून, ३२ लोकांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : लॉकडाऊनचा परिणाम: भारत-नेपाळ सीमेवर अडकले हजारो भारतीय कामगार