मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाच्या संकटावरून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. सध्याची राज्याची स्थिती ही चांगल्या कारभाराऐवजी सर्कशीसारखी आहे, अशी त्यांनी टीका केली. ते भाजप कार्यकर्त्यांच्या ऑनलाइन रॅलीमध्ये बोलत होते.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्थलांतरित मजुरांसाठी मदत करणाऱ्या अभिनेता सोनू सुद याचे कौतूक केले.
ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे बळकट नेतृत्व असताना राज्यातील स्थिती दुर्देवी आहे. सरकारमधील आघाडीमध्ये सत्तेची हाव वाढत आहे, अशी त्यांनी शिवसेनेवर टीका केली.
कोरोना झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेसाठी 16 तास वाट पाहावी लागते. तेव्हा, राज्यात सरकार अस्तित्वात आहे का, असे आश्चर्य वाटते.
अभिनेता सोनू सूद याच्या कार्यामागे भाजपचा हात असल्याची शिवसेनेने टीका केली होती. त्यावरही राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीका केली.
सरकारने कौतुक करण्याऐवजी अभिनेता सोनू सूदवर टीका करत आहे. त्याने मजुरांना घरी पाठवण्याचे काम केले आहे. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव कसा करायचा हे महाराष्ट्राने उत्तर प्रदेश आणि कर्नाटककडून शिकावे असा त्यांनी टोलावजा सल्ला दिला.