पणजी - स्वातंत्र्य दिनानिमित्त क्रिडा संचालनालयाने आज जुने सचिवालय ते मिरामार अशी ५ किलोमीटरची विविध गटांतील 'रोड रेस' (धावण्याची शर्यत) आयोजित केली होती. या स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील विजेत्यांना पणजीचे महापौर उदय मडकईकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
ही धावण्याची शर्यत विविध वयोगटातील मुलां-मुलींसाठी स्वतंत्र घेण्यात आली. शर्यत सुरू असताना वरूणराजाचे आगमन झाले.
विविध वयोगट आणि विजेते (प्रथम तीन) या प्रमाणे -
१४ ते १६ वर्षे मुले-
१) आग्नेल फारिया
२) साईश गवस
३) गौरांग कुकळकर
तिघेही फादर आग्नेल हायस्कूल पिलार
१४ ते १६ वर्षे मुली-
१) रुची दळवी (मुष्टीफंड हायस्कूल, पणजी),
२) सिद्धी भट (डॉ. के.ब.हेडगेवार हायस्कूल, पणजी)
३) डोरीस गौर (मेरी इमेक्यूलेट हायस्कूल)
१७ ते १९ वर्षे मुले
१) सीडेम गामा (सेंट जोसेफ हायस्कूल सांगोल्डा)
२) अनिश शेटकर (हरमल पंचक्रोशी हायस्कूल, हरमल)
३) निरंजन च्यारी (हरमल पंचक्रोशी हायस्कूल)
१७ ते १९ वर्षे मुली
१) प्रज्ञा चव्हाण (सांताक्रूझ हायस्कूल, सांताक्रूझ)
२) खुशी गावडा (सांताक्रूझ हायस्कूल सांताक्रूझ)
३) दीव्या शेटगावकर (सेंट झेवियर हायस्कूल, म्हापसा)
20 वर्षे वयोगट
मँक्सिलीया गोवर या एकमेव खेळाडूने सहभाग घेत स्पर्धा पूर्ण केली.
विजेत्यांना महापौर मडकईकर यांच्या हस्ते चषक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी क्रीडा संचालनालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.