जगातील वेगेवेगळे देश महिलांविरोधात अपशब्द वापरणे आणि बलात्कार करणाऱ्यांना कडक शिक्षा देत आहेत. इस्लामी देशांत, मृत्युदंड आणि जाहीररित्या दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा दिल्या जातात. काही देशांमध्ये, खटले त्वरेने चालवले जातात आणि गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन आरोपींना शिक्षा फर्मावण्यात येते.
उत्तर कोरिया - कोणतीही दयामाया न दाखवता बलात्कारींना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येते. बंदूकधारींचे पथक आरोपीला समोर उभे करून त्याच्या डोक्यात किंवा शरीराच्य अन्य महत्वाच्या भागावर गोळीबार करून ठार करते.
चीन - बलात्कार हा येथे भयानक गुन्हा समजला जातो. न्यायपालिका तातडीने खटला निकाली काढते आणि तपासही झटपट केला जातो. दोषींना मागून गोळ्या घालून ठार करण्यात येते. काही प्रकरणात शिश्नच्छेदाचा(कॅस्ट्रेशन) उपयोगही केला जातो. पण बहुसंख्य प्रकरणांमध्ये, बळी पडलेल्या महिला लाजेपोटी गप्प बसणेच पसंत करतात.
सौदी अरेबिया - खटला समाप्त झाल्याच्या काही दिवसातच शिक्षा फर्मावली जाते. बलात्कारीला गुंगी येणारे औषध दिल्यानंतर त्याचा जाहीररीत्या शिरच्छेद करण्यात येतो. काही प्रकरणांत, त्यांना दगडाने ठेचून मारले जाते.
इराण - गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जाते. त्यांना एकतर गोळी घातली जाते किंवा फासावर लटकवले जाते. जर पीडित महिलेने संमती दिली तर, मृत्युदंडाची शिक्षा स्थगित करून त्याला १०० फटके किंवा जन्मठेपेची शिक्षाही दिली जाते.
अफगाणिस्तान - गुन्हा केल्यानंतर चार दिवसांच्या आत शिक्षा दिली जाते. दोषीला एकतर डोक्यात गोळी घातली जाते किंवा त्याला फासावर लटकवले जाते. पीडित महिलेला स्वतः आरोपीला शिक्षा करण्याची तरतूदही आहे.
संयुक्त अरब अमिरात, इजिप्त - पापी आणि दुराचारी व्यक्तींना फासावर लटकवले जाते. संयुक्त अरब अमिरातीत, खटल्याच्या सात दिवसांच्या आत शिक्षा अमलात आणली जाते.
पाकिस्तान - सामूहिक बलात्कार, लहान मुंलावर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार या गुन्ह्याचे दोषी आढळलेल्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. तसेच हीच शिक्षा जे लोक महिलांचे अवयव उघडे करून तिला दुखापत करतात, त्यांनाही दिली जाते.
क्यूबा - १२ वर्षांच्या आतील मुलीवर पूर्वी लैंगिक अत्याचार किंवा तिचा विनयभंग केल्याचा आरोप असल्यास आरोपीचा मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येते.
फ्रान्स - लैंगिक शोषणाबद्दल दोषी आढळलेल्यांना १५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा दिली जाते. गुन्ह्याची तीव्रता आणि क्रूरता लक्षात घेऊन, ही शिक्षा ३० वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.
इस्रायल - बलात्कारींना १६ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. काहीवेळा, त्यांना जन्मठेपेचीही शिक्षा सुनावण्यात येते. कोणत्याही प्रकारचे लैंगिक शोषण याच प्रकारच्या शिक्षेस पात्र आहे.
बांगलादेश - लैंगिक गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येते. फाशीची शिक्षा ही अत्यंत दुर्मिळ असून अत्यंत क्रूर अशा प्रकरणांमध्ये तशी तरतूद आहे.
जपान - गुन्हेगारांना २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येते. चोरी करताना लैंगिक बलात्कार केल्यास, मृत्युदंडाच्या शिक्षेची शक्यता असते.
अमेरिका - तेथे दोन प्रकारचे कायदे आहेत, संघराज्य आणि राज्याचा कायदा. संघराज्य कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये, बलात्कारींना ३० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा दिली जाते. लैंगिक गुन्हे करणाऱ्यांसाठी तीन स्तरावरील शिक्षा आहेत. लुइझियाना आणि फ्लोरिडा राज्यांत, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.
नॉर्वे - गुन्ह्याच्या तीव्रतेच्या प्रमाणानुसार, लैंगिक गुन्हेगारांना ४ ते २० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा होते. महिलेल्या संमतीविना केलेला कोणतीही लैंगिक कृती ही बलात्कार समजला जातो.
रशिया - गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार ४ ते १५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा दिली जाते. गुन्हेगारांना २० वर्षे नोकरी करण्यास मनाई करण्यात येते. लहान मुलींवर हल्ला केल्यास शिक्षा अधिक कडक केली जाते.
नेदरलँड्स - फ्रेंच किस आणि लैंगिक छळ यांचाही लैंगिक हल्ल्यात समावेश करण्यात आला आहे. गुन्हेगारांना ४ ते १५ वर्षे तुरूंगाची हवा खावी लागते.