डिब्रुगढ - भारतीय रेल्वे ही जगातली सर्वांत मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकराच्या सेवा चालवते. रेल्वेतून रोज लाखो प्रवाशी यात्रा करतात. भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे म्हणजे ‘विवेक एक्स्प्रेस’ आहे. ही भारतीय उपखंडातील सर्वात लांबचा प्रवास करणारी तर जगातील ९व्या क्रमांकाची लांब रेल्वेगाडी आहे.
सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे ‘विवेक एक्स्प्रेस’ ही वेळ आणि अंतराच्या मानाने देशातील सर्वात मोठी ट्रेन आहे. विवेक एक्सप्रेस 82 तास 50 मिनिटांमध्ये 4 हजार 230 किलोमीटरचे अंतर कापत 9 राज्यांमधून जात 56 स्थानकांवर थांबते.
दिब्रुगड येथून शनिवारी रात्री 11.05 मिनिटांनी ट्रेन सुटते तर कन्याकुमारीला बुधवारी सकाळी 09.55 ला पोहचते. विवेक एक्सप्रेस आपल्या एकूण प्रवासामध्ये 4 दिवस 10 तास आणि 55 मिनिटांचा वेळ घेते.
विवेक एक्स्प्रेसनंतर सर्वांत लांब पल्ला पार करणारी दुसऱ्या क्रमांकाची रेल्वे हिमसागर एक्सप्रेस आहे. हिमसागर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक आठवड्यातून एक दिवस धावणारी आगगाडी आहे. ही रेल्वेगाडी भारताच्या तामिळनाडू राज्याच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी पासून उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर राज्याच्या वैष्णोदेवी जवळील कटरा शहरापर्यंत धावते.