हैदराबाद : शनिवारी सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करत, देशभरात छठ पूजेचा उत्सव समाप्त झाला. सूर्याचे दर्शन होताच देशभरातील लाखो भाविकांनी जल अर्पण केले. बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, झारखंड यांसह देशाच्या विविध भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून हा छठ महापर्व उत्सव सुरू होता. पाहूयात, देशातील विविध ठिकाणी कशा प्रकारे पार पडली सूर्यपूजा...
उत्तर भारतीयांसाठी सगळ्यात महत्वाचा असणारा सण म्हणजे छठ पूजा, दिवाळीत ही पूजा केली जाते. सूर्याची उपासना करण्यासाठी छठ पूजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरणाप्रति समर्पणाची भावना आहे.
देशभरात विविध ठिकाणच्या नदीतटांवर मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. काही ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नियमांचे पालन करत ही पूजा पार पडली, तर बऱ्याच ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळाला.
हेही वाचा : भाकरी विकणाऱ्या महादेवींची प्रेरणादायी कहाणी; २०० महिलांना दिलाय रोजगार