शिमला - हिमाचल प्रदेशात तापमान उणे 3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. प्रचंड हिमवर्षांवातही 7874 फूट उंचीवर असेलेल सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ बिजली महादेवला जाण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.
हवामान साफ होताच भाविक शंकराच्या दर्शनासाठी निघाले होते. शनिवारी बिजली महादेव मंदिरात भाविकांची गर्दी पहायला मिळाली. मंदिर परिसरात तीन फुटांपर्यंत बर्फ साचला आहे. अशा परिस्थितीतही दिल्ली येथील भाविक मथानधार आले होते.
घटलेल्या तापमानामुळे बिजली महादेव तलाव पूर्णपणे गोठला आहे. आरूबाजूचा परिसरही नयनरम्य दिसत आहे. मंदिर परिसरातील झाडेही बर्फाने आच्छादली आहेत. हे सौंदर्य अनुभवण्यासाठी भाविक आवर्जून या ठीकाणाला भेट देत आहेत.