भोपाळ - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज(मंगळवारी) उज्जैन येथे महाकालेश्वराचे दर्शन घेतले. भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाच्या लग्नसमारंभासाठी ते मध्यप्रदेशात आले आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांनी मंदिरात अभिषेकही केला. महाकालेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
उद्या विजयवर्गीय यांच्या मुलाचा विवाह सोहळा आहे. त्याआधी दोघांनी महाकालेश्वराचे दर्शन घेतले. विवाह सोहळ्यासाठी अनेक बडे नेते राज्यामध्ये आले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. भगवान महाकालाचा मी भक्त असून अनेकदा येथे दर्शनाला येतो. मंदिरात आल्यामुळे सकारात्मक उर्जा मिळते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले.