हैदराबाद - जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. याच पार्श्वभूमिवर जगभरातील नेते आणि वैद्यकीय तज्ज्ञ सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नॉन-फार्मास्युटिकल इंटरव्हेंशन या निर्णयावर प्रतिरोधक म्हणून अवलंबून आहे. हे निर्णय मोठ्या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, अमेरिकेतील तज्ञ अद्याप कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी या उपाययोजना राबविण्याविषयी जागृत नाही.
जगातील सरकारांचे मुख्य काम म्हणजे या विषाणुचा संसर्ग रोखणे. हा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, नियमितपणे हात धुणे, घरातच राहणे, सार्वजनिक कार्यक्रम टाळणे, शाळा, महाविद्यालये बंद करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच अशावेळी विषेश रुग्णालयांची क्षमता वाढविण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची गरज भासू न देणे, संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे किंवा लस देण्यास येते. या उपायांवर प्रचंड खर्च येतो. नॉन-फार्मास्युटिकल इंटरव्हेंशन (एनपीआय) हे रुग्णालयांची क्षमता वाढविण्यासाठी सरकार आणि तज्ज्ञांची वेळ विकत घेते. संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे किंवा लस देण्यास मदत करतो.
मार्क लिपिसिच, डीफिल, हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, बोस्टन, मॅसेच्युसेट्स सांगतात, की सोशल डिस्टंसिंग पाळणे हा एकमेव पर्याय आहे. मोठ्या संख्येत चाचणी घेणे आणि एका संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याची वेळ आता निघून गेली आहे. सोशल डिस्टंसिंगचे परिणामही वाईट आहेत, मात्र त्याशिवाय पर्याय नाही, असेही लिपिसिच सांगतात. ते पुढे सांगतात, जर आपण हा वेळ वाया घालवला आणि चाचण्या घेणे, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वाढवणे, वेंटिलेटर वाढवणे आणि बेडची क्षमता वाढवण्यासाठी काही केले नाही, तर येत्या काळात ही खूप मोठी शोकांतिका असेल.