ETV Bharat / bharat

तिहार तुरुंगात ४ किलो घटले चिदंबरम यांचे वजन, आता मिळणार घरचे जेवण

author img

By

Published : Oct 4, 2019, 1:06 PM IST

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पी. चिदंबरम यांना राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने घरचे जेवण खाण्याची परवनागी दिली आहे.

चिदंबरम

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पी. चिदंबरम यांना राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने घरचे जेवण खाण्याची परवनागी दिली आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चिदंबरम यांना आणखी काही दिवस तिहार तुरुंगातच राहावे लागणार आहे. चिदंबरम हे ७४ वर्षाचे असून तुरुंगातील जेवणामुळे त्यांच्या अन्ननलिकेला सूज आल्याचे चिदंबरम यांच्या वकिलाने याचिकेमध्ये म्हटले होते. याचबरोबर त्यांचे ४ किलो वजन कमी झाले आहे. त्यामुळे विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहर यांनी घरचे जेवण देण्याची परवानगी दिली आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक केली होती. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.सीबीआय त्यांची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करत असतानाच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) त्यांची अवैध संपत्ती प्रकरणी चौकशी करत आहे. चिदंबरम यांच्यावर परकीय गुंतवणूक संवर्धन बोर्डाकडून (एफआईपीबी) आयएनएक्स मीडियाला मंजुरी देताना 2007 मध्ये 305 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.