ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार : अमित शाह अ‌ॅक्शनमध्ये, 24 तासात घेतल्या तीन बैठका

author img

By

Published : Feb 26, 2020, 2:24 AM IST

दिल्लीतील परिस्थिती पाहता अमित शाह यांनी तिरुवनंतपूरमचा दौरा रद्द केला आणि तातडीने दिल्लीतील परिस्थितीबाबत पोलीस प्रशासनासोबत बैठक घेतली. या बैठकीला दिल्लीचे नवनियुक्त विशेष पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांच्यासह दिल्ली पोलिसमधील वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी होते.

delhi violence : Home Minister Amit Shah held a long meeting that lasted for almost 3 hours with Delhi Police & Home Ministry officials
दिल्ली हिंसाचार : अमित शाह अॅक्शनमध्ये, 24 तासात घेतल्या तीन बैठका

नवी दिल्ली - दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (CAA) सुरू असलेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ही बैठक तीन तास चालली. दरम्यान, शाह यांची मागील 24 तासातील ही तिसरी बैठक आहे.

  • MHA Sources: Home Minister Amit Shah held a long meeting that lasted for almost 3 hours with Delhi Police & Home Ministry officials. Newly appointed Special Commissioner of Police SN Srivastava also attended the meeting. It was the 3rd meeting chaired by HM in less than 24 hours. pic.twitter.com/rWwsDAkXP4

    — ANI (@ANI) February 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्लीतील परिस्थिती पाहता अमित शाह यांनी तिरुवनंतपूरमचा दौरा रद्द केला आणि तातडीने दिल्लीतील परिस्थितीबाबत पोलीस प्रशासनासोबत बैठक घेतली. या बैठकीला दिल्लीचे नवनियुक्त विशेष पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांच्यासह दिल्ली पोलिसमधील वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी होते.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून ईशान्य दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 170 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. एक पोलीस हेड कॉन्स्टेबलसह बारा नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. हिंसाचारामुळे ईशान्य दिल्लीतील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर सीबीएसईने या भागातील 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच जाफराबाद, बाबरपुरी, गोकुलपुरी, जौहरी एनक्लेव्ह आणि शिव विहार येथील मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा -

हिंसाचारामुळे दिल्लीत शाळा बंद; सीबीएसईच्या १०, १२ वीच्या परीक्षा रद्द

हेही वाचा -

दिल्ली हिंसाचार : दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, डोवाल यांनी घेतला आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.