ETV Bharat / bharat

कोरोना : दिल्लीतील हॉटस्पॉटचा आकडा पोहचला 25 वर

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 'फाईव्ह पॉईंट ॲक्शन प्लॅन' जाहीर केला आहे यामध्ये दिल्लीमध्ये तातडीने एक लाख कोविड-19 च्या तपासण्या होणार आहेत. या तपासण्या शहरातील हॉटस्पॉट परिसरांमध्ये होतील.

author img

By

Published : Apr 10, 2020, 12:49 PM IST

कोरोना
कोरोना

नवी दिल्ली - दिल्ली सरकारने गुरुवारी राजधानीतील कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका असलेल्या हॉटस्पॉटची नवी यादी जाहीर केली. आता ही यादी 25 वर गेली आहे. म्हणजेच, दिल्लीमध्ये सध्या कोविड-19 सर्वाधिक धोका असलेली 25 ठिकाणे आहेत. याआधी बुधवारी 20 हॉटस्पॉटची यादी जाहीर केली होती.

बुधवारी रात्री तीन नवे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर बंगाली मार्केटला हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट करण्यात आले. यासह जे. जे. कॉलनीतील शास्त्री मार्केट, सदर बाजार, B1 आणि B2 ब्लॉक, पश्चिम विहारमधील काही भाग, निजामुद्दीन दर्गाह आणि निजामुद्दीन बस्ती हे हॉटस्पॉट नव्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व नागरिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यामध्ये त्यांनी कोविड-19 या महामारीशी लढण्यासाठी सरकार उचलत असलेली पावले आणि लोकांनी घ्यावयाची खबरदारी याविषयी माहिती दिली. त्यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना मास्क वापरण्याचे आणि विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन केले.

दिल्लीतील पुढील परिसर पूर्णपणे सील करण्यात आले आहेत -

गांधी पार्क नजीकचा कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला संपूर्ण रस्ता, मालवीय नगर, संगम विहार येथील मुख्य रस्त्याच्या गल्ली क्रमांक 6 आणि L 1, शहाजहाँबाद सोसायटी, द्वारकेचे प्लॉट नंबर 1 आणि सेक्टर 11, दिनपूर व्हिलेज, मरकज मशीद आणि निजामुद्दीन बस्ती, निजामुद्दीन पश्चिम (जी आणि डी ब्लॉक), बंगाली मार्केट निजामुद्दीन बस्ती आणि निजामुद्दीन दर्गा

दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 'फाईव्ह पॉईंट ॲक्शन प्लॅन' जाहीर केला आहे यामध्ये दिल्लीमध्ये तातडीने एक लाख कोविड-19 च्या तपासण्या होणार आहेत. या तपासण्या शहरातील हॉटस्पॉट परिसरांमध्ये होतील.

सध्या येथील शहरातील रुग्णालयांमध्ये 2 हजार 950 बेड्स पूर्णपणे कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवले आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्ली सरकार लवकरच विविध हॉटेल मधील 12 हजार खोल्या बाधित रुग्ण आणि संशयित रुग्णांसाठी ताब्यात घेणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.