ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचाराप्रकरणी उमर खालिदला पुन्हा एकदा अटक; सुनावली 3 दिवसांची कोठडी - दिल्ली हिंसाचार प्रकरण

दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला आज गुन्हे शाखेने अटक केली असून त्याला 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

delhi-riots-case-former-jnu-student-umar-khalid-arrested
दिल्ली हिंसाचाराप्रकरणी उमर खालिदला पुन्हा एकदा अटक; सुनावली 3 दिवसांची कोठडी
author img

By

Published : Oct 1, 2020, 9:20 PM IST

नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला आज गुन्हे शाखेने अटक केली असून त्याला 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

यापुर्वी 14 सप्टेंबरला खालिदला अटक करून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याची २ तास चौकशी केली होती. तसेच त्याच्यावर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करून या दंगलीचा कट रचल्याचा आरोप करत त्याचा मोबाईलदेखील पोलिसांनी ताब्यात घेतला होता.

२ फेब्रुवारी रोजी ईशान्य दिल्लीत नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचे समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू झाला होता, त्यात 53 लोकांचा मृत्यू तर २०० जण जखमी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.