ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरणी दोषी पवन गुप्ताची याचिका फेटाळली - निर्भया प्रकरण

निर्भया प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या पवन गुप्ताची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

निर्भया प्रकरण
निर्भया प्रकरण
author img

By

Published : Dec 19, 2019, 4:12 PM IST

Updated : Dec 19, 2019, 5:50 PM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या पवन गुप्ताची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. पवनने या याचिकेत घटनेच्या वेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी त्याने मागणी केली होती.

  • Delhi High Court dismisses the plea of Pawan Kumar Gupta, one of the convicts in Nirbhaya case, who had moved the court claiming that he was a juvenile at the time of the offence in 2012 and should be treated under the Juvenile Justice Act. pic.twitter.com/LtUDkho6dP

    — ANI (@ANI) 19 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुप्ता याने बुधवारी न्यायालयात धाव घेतली होती. २०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी त्याने केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून पवनचे वकील ए. पी. सिंग यांना न्यायालयाची दिशाभूल केल्या प्रकरणी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने पवनचे वकील ए. पी. सिंह यांच्याविरूद्ध बार काऊन्सिलकडे तक्रार केली आहे. पवनच्या वयाबद्दल माहिती देताना खोटी कागदपत्र, प्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेव्हिट) दिल्याप्रकरणी त्यांच्यावरही कारवाईचे आदेश आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक दोषी अक्षय कुमारसिंह याची फाशीच्या शिक्षेविरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे. या निर्णयानंतर निकालाचे पुनवरालोकन करण्यासाठी आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्यासाठी एका आठवड्याची मुदत त्याला देण्यात आली आहे.

'निर्भया' पॅरामेडिकलची विद्यार्थिनी होती. १६ डिसेंबर २०१२ ला तिचे अपहरण करून बलात्कार करून तिला ठार करण्यात आले होते. या प्रकरणात ६ जण दोषी होते. यापैकी अल्पवयीन गुन्हेगाराला किशोर गुन्हेगारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. इतर पाच जणांपैकी एकाने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. तर, उर्वरित चौघांना न्यायालयाने २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. या ४ जणांना तत्काळ फाशी द्यावी, अशी जोरदार मागणी सुरू आहे.

Intro:Body:

निर्भया प्रकरण  : दोषी पवन गुप्ताची याचिका फेटाळली, पुढील सुनावणी 24 जानेवरीला

नवी दिल्ली -  निर्भया प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या पवन गुप्ता याची बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली.  तर याप्रकरणी पुढील सुनावणी 24 जानेवरीला होणार आहे.

गुप्ता याच्या वकिलांनी या प्रकरणात आणखी काही ताजे पुरावे गोळा करण्यासाठी वेळ मागितली. त्याला मान्यता देत, दिल्ली न्यायालयाने पुढील सुनावणी २४ जानेवारी २०२०ला होईल असे जाहीर केले.

गुप्ता याने बुधवारी न्यायालयात धाव घेतली होती. २०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो, त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी त्याने मागणी केली होती.

 दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक दोषी अक्षय कुमार सिंह याची फाशीच्या शिक्षेविरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे. या निर्णयानंतर निकालाचे पुनवरालोकन करण्यासाठी, आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्यासाठी एका आठवड्याची मुदत त्याला देण्यात आली आहे.

'निर्भया' पॅरामेडिकलची विद्यार्थिनी होती. १६ डिसेंबर २०१२ ला तिचे अपहरण करून बलात्कार करून तिला ठार करण्यात आले होते. या प्रकरणात ६ जण दोषी होते. यापैकी अल्पवयीन गुन्हेगाराला किशोर गुन्हेगारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. इतर पाच जणांपैकी एकाने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. तर, उर्वरित चौघांना न्यायालयाने २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. या ४ जणांना तत्काळ फाशी द्यावी, अशी जोरदार मागणी सुरू आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 19, 2019, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.