नवी दिल्ली - संसदेच्या ग्रंथालय इमारतीत सत्ताधारी रालोआची सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. पंतप्रधान मोदीही बैठकीला पोहोचले आहेत.
गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत आणि अर्जुन राम मेघवाल या बैठकीत सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत.
बैठकीत भाग घेण्यासाठी बसपचे खासदार सतीश चंद्र मिश्रा, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन आणि सुदीप बंदोपाध्याय, एलजेपीचे खासदार चिराग पासवान आणि काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी हेही पोहोचले आहेत.
शनिवारीही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य वरिष्ठ नेतेही यात सहभागी झाले होते. संसदेचे हिवाळीस अधिवेशन 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.