नवी दिल्ली – अनेक भूमिका पार पाडणाऱ्या राफेलच्या खरेदीच्या सौद्याचे समर्थन केले होते. बोफोर्सप्रमाणे विषय होवू नये, याकरिता राजकीय वादाचे आजवर समर्थन केले नसल्याचे हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी म्हटले आहे. त्यांनी देशात आलेल्या राफेलचे स्वागत केले आहे.
हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ म्हणाले, कीमी राफेलच्या सौद्याचे समर्थन केले. मात्र, राफेल बोफोर्सप्रमाणे वादहोवू नये, असे वाटत होते. संरक्षण दलाच्या खरेदीच्या प्रक्रियेचे राजकारण करण्याला आमचा विरोध होता. त्यामुळे हवाई दलाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होतात, असे धानोआ यांनी म्हटले आहे. राफेल हे चीनच्या जे-20 एसपेक्षा अधिक शक्तिशाली लढाऊ विमान असल्याचे धनोआ यांनी सांगितले.
धनोआ म्हणाले, की राफेल देण्यात आल्याने मला भारतीय हवाई दलाबाबत अत्यंत आनंद वाटत आहे. त्यामुळे हवाई दलाची उड्डाण आणि तंत्रज्ञानाच्या कक्षेत मोठी क्षमता वाढणार आहे. खूप काळापासून ही कमतरता जाणवत होती. धनोआ हे सध्याचे हवाई दलाचे प्रमुख राकेश कुमार सिंह बहादुरिया यांच्यापूर्वी हवाई दलाचे प्रमुख म्हणून गतवर्षी सप्टेंबरपर्यंत कार्यरत होते.
फ्रान्सबरोर 36 राफेलची विमाने खरेदी करण्यासाठी 59 हजार कोटींचा चार वर्षांपूर्वी सौदा करण्यात आला होता. त्यानंतर भारताला पहिल्या टप्प्यातील पाच राफेलची लढाऊ विमाने मिळाली आहेत. यापूर्वी भारताला सुखोई-30 केएस ही लढाऊ विमाने 1997 ला मिळाली होती. त्यानंतर 23 वर्षानंतर हवाई दलात सुसज्ज अशी लढाऊ विमाने दाखल होत आहेत.
दरम्यान,बोफार्स तोफांची 1980 मध्ये खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आजवर आरोप करण्यात आले आहे.