ETV Bharat / bharat

भारत-चीन सीमावाद : संरक्षण मंत्री शुक्रवारी लडाखला भेट देण्याची शक्यता - नियंत्रण रेषा भारत चीन

लडाख भेटीत संरक्षण मंत्री लष्करातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोरे, पाँगयाँग त्सो लेक, डेपसांग प्लेन, श्योक नदी अशा अनेक भागात चीनने अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
author img

By

Published : Jul 1, 2020, 7:38 PM IST

नवी दिल्ली - भारत-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील लष्कराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी पूर्व लडाखचा दौरा करण्याची शक्यता आहे. गलवान व्हॅलीतील धुमश्चक्रीनंतर सीमेवर अजूनही तणाव आहे. हा तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच नियंत्रण रेषेवर अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा कुटिल डाव चीनकडून सुरू आहे.

लडाख भेटीत संरक्षण मंत्री लष्करातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोरे, पाँगयाँग त्सो लेक, डेपसांग प्लेन, श्योक नदी अशा अनेक भागात चीनने अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. दोन्ही देशांमधील सीमेवरील शांततेच्या करारांच्या विरोधात असल्याचे भारताने म्हटले आहे.

राजनैतिक आणि लष्करी स्तरावर तणाव निवळण्यासाठी चर्चा सुरू आहेत. मात्र, अजूनही तोडगा निघाला नाही. चीनने संपूर्ण गलवान व्हॅलीवर दावा सांगितला आहे. भारताने चीनचा हा दावा फेटाळून लावला आहे. चीनकडून सीमेवर आक्रमक धोरण स्वीकारण्यात येत आहे. त्यामुळे भारतही सीमेवर सतर्क झाला आहे.

चीनकडून नव्याने 20 हजार सैन्य तैनात -

पूर्व लडाखमधील सीमारेषेवर चीनने दोन डिव्हिजन म्हणजेच सुमारे 20 हजार सैनिक तैनात केले आहे, तर आणखी दहा हजार सैनिक चीनने सीमारेषेपासून 1 हजार किलोमीटर लांब ठेवले आहे. मात्र, हे सैनिक जलद सीमेवर पोहोचण्याची क्षमता आहे. सपाट भूप्रदेश असल्याने चिनी सैनिक जलद हालचाल करू शकते, असे लष्करातील सूत्रांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.