ETV Bharat / bharat

कोरोनामुळे देशभरात 937 दगावले; बाधितांचा आकडा 29 हजार 974

author img

By

Published : Apr 28, 2020, 8:14 PM IST

Updated : Apr 28, 2020, 8:40 PM IST

देशभरात झालेल्या 937 मृत्यूंपैकी सर्वात जास्त महाराष्ट्रात 396 जण दगावले आहेत. त्याखालोखाल गुजरातमध्ये 162 जण दगावले आहेत.

file pic
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाची लागण झाल्याने 937 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे, तर एकूण रुग्णांचा आकडा 29 हजार 974 वर पोहचला आहे. मागील 24 तासात 51 रुग्ण दगावले तर 1 हजार 594 नव्याने रुग्णांची नोंद झाली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

एकूण रुग्णांपैकी 22 हजार 10 अ‌ॅक्टिव्ह केसेस असून 7 हजार 26 रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. एकूण कोरोना बाधितांपैकी 23. 44 टक्के रुग्ण बरे झालेत. देशातल्या एकूण रुग्णांपैकी 111 जण परदेशी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील उच्चपदस्थांनी दिली.

मागील 24 तासात 51 जणांचा देशात मृत्यू झाला. त्यातील 27 जण महाराष्ट्रातील, 11 गुजरातमधील, 7 मध्यप्रदेशातली, 5 राजस्थानातील तर एक जण जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

कोणत्या राज्यात किती रुग्ण दगावले?

देशभरात झालेल्या 937 मृत्यूंपैकी सर्वात जास्त महाराष्ट्रात 396 जण दगावले आहेत. त्याखालोखाल गुजरातमध्ये 162 जण, मध्यप्रदेश 113, दिल्ली 54, राजस्थान 46 तर आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेशात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगाणा राज्यात 26, तामिळनाडूत 24 आणि पश्चिम बंगाल आणि कर्नाटकात प्रत्येकी 20 रुग्ण दगावले आहेत. पंजाबमध्येही 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू काश्मीरात 7 जण, केरळात 4 जण तर हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये 2 मृत्यू, तर हिमाचल प्रदेश, मेघालय आणि ओडिशा आणि आसामात प्रत्येकी 1 जण दगावला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

Last Updated : Apr 28, 2020, 8:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.