ETV Bharat / bharat

बिहार : हुतात्मा सुनील कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार - हुतात्मा सुनील कुमार

वीर जवान सुनील कुमार हे 2002 साली बिहार रेजिमेंटमधून सैन्यात भरती झाले होते. 2003 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. सुनील यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. एक वर्षापूर्वी लडाख येथे त्यांची बदली झाली होती. त्यापूर्वी ते दानापूर येथे तैनात होते. त्यानंतर सीमेवर त्यांना वीरमरण आले.

अंत्ययात्रा
अंत्ययात्रा
author img

By

Published : Jun 18, 2020, 10:20 AM IST

Updated : Jun 18, 2020, 1:37 PM IST

पाटणा (बिहार) - लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चिनी सैन्यातील हाणामारीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. यामध्ये बिहारच्या बिहटा जिल्ह्यातील पैतृक या गावातील सुनील कुमार यांचाही समावेश होता. त्यांचे पार्थिव आज (दि. 18 जून) सकाळी त्यांच्या मुळगावी पोहोचले होते. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर मनेरच्या छपरा घाट या स्मशानभूमीत साश्रू नयनांनी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी सुनील कुमार अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा देण्यात आल्या.

हुतात्मा सुनील कुमार यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

2003 ला झाले होते लग्न
वीर जवान सुनील कुमार हे 2002 साली बिहार रेजिमेंटमधून सैन्यात भरती झाले होते. 2003 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. सुनील यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. एक वर्षापूर्वी लडाख येथे त्यांची बदली झाली होती. त्यापूर्वी ते दानापूर येथे तैनात होते.

मनेर येथे निघाली अंत्ययात्रा
हुतात्मा सुनील कुमार यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सेनेच्या जवानांनी त्यांना त्यांच्या पैतृक गावात सलामी दिली. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा प्रारंभ झाली. दुपारी १२ च्या सुमारास मनेर येथे त्यांच्या पार्थिवास मुखाग्नी देण्यात आहे.

पतीला श्रद्धांजली देताना पत्नीचा 'सॅल्यूट'

हुतात्मा सनील कुमार यांच्या पत्नी
सॅल्यूट करताना हुतात्मा सनील कुमार यांच्या पत्नी

सुनील कुमार यांचे मोठे भाऊ अनिल कुमार हे 2009 साली सैन्यातून सेवानिवृत्त झाले होते. सुनील कुमारही 2002 साली सैन्यात भरती झाले होते. पैतृक गावातून अंत्यसंस्कारासठी मनेर येथे त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. त्यावेळी त्यांच्या पत्नीने सॅल्यूट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व सैन्य अधिकारी उपस्थित होते.

हेही वाा - हुतात्मा के. पलानी यांचे पार्थिव मदुराईत दाखल, आज होणार अंत्यसंस्कार

Last Updated : Jun 18, 2020, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.