नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये महिला आयोग आणि पोलिसांनी कारवाई करत सेक्स रॅकेट उघडकीस आणले. 'जन्नत' आणि 'जास्मिन' या स्पा सेंटरमध्ये छुप्या पद्धतीने हे रॅकेट चालवले जात होते.
हेही वाचा - आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, तिहार तुरुंगात रवानगी
अचानक टाकलेल्या छाप्यात अनेक मुले आणि मुली आक्षेपार्ह स्थितीमध्ये सापडली. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे. पकडल्या गेलेल्या मुली आणि सेक्स रॅकेट चालवणाऱ्या स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाने गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.