ETV Bharat / bharat

महिला दिन विशेष : शेतकऱ्याची मुलगी, आई अन् जगज्जेत्ती बॉक्सिंगपटू.. मेरी कोमचा विलक्षण प्रवास!

author img

By

Published : Mar 1, 2020, 6:08 PM IST

जागतिक महिला दिन जवळ आलेला असताना, त्यानिमित्ताने पाहूयात, आठ वेळा बॉक्सिंगमध्ये जगज्जेत्ती राहिलेल्या, आणि 'पद्मविभूषण' हा सन्मान प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू.. 'मेरी कोम' यांचा प्रवास...

Daughter of farmer, mother, world-beater: Celebrating Mary Kom's journey
महिला दिन विशेष : शेतकऱ्याची मुलगी, आई अन् जगज्जेत्ती बॉक्सिंगपटू.. मेरी कोमचा विलक्षण प्रवास!

एक मुलगी, जिने आपल्या स्वप्नांसाठी घर सोडले. समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत, जी आपण निवडलेल्या मार्गावर चालत राहिली. एक आई, जिने देशाचा तिरंगा हा जगभरातील बॉक्सिंग रिंग्समध्ये डौलाने फडकावला.. जागतिक महिला दिन जवळ आलेला असताना, त्यानिमित्ताने पाहूयात, आठ वेळा बॉक्सिंगमध्ये जगज्जेत्ती राहिलेल्या, आणि 'पद्मविभूषण' हा सन्मान प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू, 'मेरी कोम' यांचा प्रवास!

शेतातून बॉक्सिंग रिंगमध्ये...

मेरी कोम यांचा जन्म १ मार्च १९८३ला मणीपूरच्या चंद्रपूर जिल्ह्यात झाला. लहानपणी त्या आपल्या आईवडिलांना शेतकामात मदत करत. १९९८ साली 'डिंग्को सिंह' या बॉक्सरनं बँकॉकमध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. मेरी कोमने त्यांनाच आपलं आदर्श मानलं होतं. लहानपणी अभ्यासात फारशी गती नसलेल्या मेरी, या खेळांमध्ये मात्र उत्साहानं सहभागी होत.

बॉक्सिंग रिंगमध्ये मुलींनाही खेळताना पाहून, लहानग्या मेरीला वाटायचं की आपणही हे करावं. मात्र, त्याला केवळ घरून विरोध नव्हता, तर त्यांची आर्थिक परिस्थितीही तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुरेशी नव्हती.. तरीही, १५ वर्षांच्या मेरीला बॉक्सिंग ग्लव्हज घालण्यापासून कोणी रोखू शकलं नाही.

कालांतराने तिच्या घरच्यांनीही मेरीला पाठिंबा दिला. २००१मध्ये, जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकत, तिचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर मेरीने सुवर्णपदकावरही आपलं नाव कोरलं, आणि विश्वकरंडक स्पर्धेमध्ये तीन पदकं मिळवली.

शेतकऱ्याची मुलगी, आई अन् जगज्जेत्ती बॉक्सिंगपटू.. मेरी कोमचा विलक्षण प्रवास!

'सुपर मॉम' मेरी..

२००५ मध्ये जेव्हा मेरी कोमने ओन्लर कोम या फुटबॉलपटूशी विवाह केला, तेव्हा तिच्या प्रशिक्षकांना दुःख झाले, कारण त्यांना वाटले की आता मेरी कोम बॉक्सिंगमधून निवृत्ती घेईल. मात्र जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतरही, ओन्लरच्या साथीने मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये पुनरामन केले. मेरीला बॉक्सिंगचा सराव करता यावा, यासाठी ओन्लरने घराची जबाबदारी स्वीकारली.

आणि त्यानंतर, पूर्वीपेक्षा अधिक जोमाने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरत, मेरी कोमने तिचं चौथे जागतिक सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतरही हा सपाटा सुरू ठेवत, तिनं एकूण आठ विश्वकरंडक पदकं जिंकली. यामध्ये सहा सुवर्णपदकांचा समावेश होता. यातील बहुतांश पदकं तिने आई झाल्यानंतर जिंकल्यामुळं, तिला 'सुपर मॉम' हे नाव मिळालं.

पद्मविभूषण मिळवणारी पहिली महिला खेळाडू..

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमधील पदकं वगळता, मेरीने कॉमन्वेल्थ आणि आशियाई स्पर्धांमध्येही आपली छाप उमटवली. शिवाय, २०१२च्या ऑलम्पिक्समध्ये कांस्यपदक मिळवत, अशी कामगिरी करणारी ती पहिली, आणि अद्याप एकमेव महिला बॉक्सर ठरली.

तिला वेळोवेळी देशातील सर्वोच्च पुरस्कारही मिळाले, यामध्ये अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी असलेले पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण हे पुरस्कारही तिला देण्यात आले. पद्मभूषण हा सन्मान मिळवणारी ती देशातील चौथी खेळाडू, आणि पहिलीच महिला खेळाडू ठरली. हा सन्मान मिळवत, ती बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांच्या रांगेत जाऊन बसली आहे.

एक शेतकऱ्याची मुलगी, आणि एक आई... जिने जग जिंकले! अशा या मेरी कोम यांना पाहून आज लाखो भारतीयांना प्रेरणा मिळते!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.