नवी दिल्ली - चिनी गुंतवणूक असलेल्या भारतातील बिग बास्केट या ऑनलाइन किराणा माल विकणाऱ्या कंपनीवर सायबर हल्ला झाल्याची माहिती आहे. बिग बास्केटच्या सुमारे दोन कोटी ग्राहकांचा डेटा चोरला गेला आहे. हा डेटा डेटा डार्कवेबवर विकला जात असल्याचेही समोर आले आहे. अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी इंटेलिजन्स कंपनी साबल इंक यांनी ही माहिती दिली आहे.
चोरीला गेलेल्या डेटामध्ये ग्राहकांची नावे, ईमेल आयडी, संकेतशब्द, पिन, संपर्क क्रमांक, जन्मतारीख, पत्ता इत्यादींची संपूर्ण माहिती आहे. बिग बास्केट कंपनीने बंगळुरुमधील सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. ग्राहकांचा डेटा डार्कवेबवर 30 लाख रुपयांना विकला जात असल्याची माहिती आहे.
14 ऑक्टोंबरला झाली डेटा चोरी -
साबल इंकनुसार बिग बास्केटच्या ग्राहकांच्या डेटाची चोरी 14 ऑक्टोंबर 2020 ला झाली होती. यासंदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाला 1 नोव्हेंबरला कळवण्यात आले होते. तर आम्ही ग्राहकांची आर्थिक खासगी डेटा स्टोअर करत नाही. त्यामुळे ग्राहकांचा आर्थिक डेटा सुरक्षीत असेल, याची खात्री आहे. आम्ही ग्राहकांचा फक्त ईमेल आयडी, फोन नंबर, ऑर्डरचे तपशील आणि पत्ते असा डेटा स्टोअर करतो, असे बिग बास्केट कंपनीने म्हटलं आहे.
डार्क वेब म्हणजे काय?
इंटरनेटवर बर्याच वेबसाइट्स ह्या गुगल, बिंग आणि सामान्य ब्राउझिंगसारख्या वापरल्या जाणार्या सर्च इंजिनच्या अंतर्गत येत नाहीत. त्यांना डार्क नेट किंवा डीप नेट असे म्हणतात. विशिष्ट अधिकृत प्रक्रिया, सॉफ्टवेअर आणि कॉन्फिगरेशनच्या मदतीने अशा वेबसाइटवर प्रवेश केला जाऊ शकतो. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 देशातील सर्व प्रकारच्या सायबर गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी वैधानिक चौकट प्रदान करतो. कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींना जेव्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद येते, तेव्हा त्या कायद्यानुसार कारवाई करतात.
हेही वाचा - उत्तर प्रदेशमध्ये सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, गळा आवळून खून