ETV Bharat / bharat

डी. रूपा झाल्या देशातील पहिल्या रेल्वे पोलीस अधिकारी; कर्नाटक विभाग सांभाळणार - International Womans Day

डी. रूपा कर्नाटक कॅडरमधील २००० बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. कर्नाटकच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते.

डी. रूपा (आयपीएस अधिकारी)
author img

By

Published : Mar 9, 2019, 12:19 PM IST

बंगळुरू - जागतिक महिला दिनाच्या पर्वावर भारतीय रेल्वेच्या पोलीस विभागाला प्रथम महिला अधिकारी मिळाली आहे. डी. रूपा असे या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना कर्नाटक येथे रेल्वेच्या पोलीस महानिरीक्षकाचा पदभार सोपवण्यात आला आहे. या पदावर नियुक्त होताच त्यांनी ट्विटरवर याबद्दल माहिती दिली. तसेच रेल्वेमध्ये प्रवास करताना कोणतीही अप्रिय घटना घटल्यास मदत मागण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

डी. रूपा कर्नाटक कॅडरमधील २००० बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. कर्नाटकच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे वडील जे. एच. दिवाकर सेवानिवृत्त अभियंता आहेत. रूपा यांनी मनोविज्ञान शास्त्रात स्नातकोत्तर पर्यंतचे शिक्षण कुवेम्पू विद्यापीठातून पूर्ण केले. भरत नाट्यम् आणि हिंदूस्तानी शास्त्रीय संगितावरही त्यांचा चांगलाच पायंडा आहे.

  • On this International Women's Day, Railway Police gets its first woman officer. l've assumed charge as IGP Railways, Karnataka. Any complaints/information on offences happening in railway stations anywhere in the state, you may bring to my notice.

    — D Roopa IPS (@D_Roopa_IPS) March 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

डी. रूपा यांना नववीत असताना माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी 'एनसीसी'ची सर्वोच्च कॅडर म्हणून सन्मानीतही केले आहे. त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची पदे भूषवली आहेत. मागच्या वर्षी जागतिक महिला दिनाच्याच दिवशी त्यांनी महिलांसाठी प्रेरणादायक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

बंगळुरूच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पदानुक्रमे त्या दुसऱ्या सर्वात मोठ्या पोलीस अधिकारी आहेत. 'टेड एक्स' सारख्या प्रसिद्ध टॉक शो मध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहेत. रेल्वे पोलीस अधिकाऱ्याचे पद मिळण्यापूर्वी त्या कर्नाटक वाहतुक पोलीस विभागामध्ये पोलीस महानिरीक्षक होत्या.

Intro:Body:

डी. रूपा झाल्या देशातील पहिल्या रेल्वे पोलीस अधिकारी; कर्नाटक विभाग सांभाळणार 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.