ETV Bharat / bharat

वायू चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले, १२ तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता - amit shah

सध्या या चक्रीवादळाचे केंद्र गोव्याच्या पश्चिम आणि नैऋत्येकडे ३५० किलोमीटरवर आहे. तर, मुंबईच्या दक्षिण नैऋत्येकडे ५१० किलोमीटरवर आणि वेरावलच्या (गुजरात) दक्षिणेला ६५० किलोमीटरवर आहे.

आयएमडी
author img

By

Published : Jun 11, 2019, 7:42 PM IST

अहमदाबाद - वायू चक्रीवादळ १३ जूनला गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ उत्तरेकडे सरकत असून याची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.

'पुढील १२ तासांत हे वादळ रौद्र रूप धारण करू शकते. तसेच, हे गुजरातमध्ये आणि गुजरातच्या उत्तरेला प्रभाव टाकू शकते. गुजरातचे पोरबंदर आणि महुवा या किनाऱयांवर वेरावल आणि दीवच्या आजूबाजूच्या भागात याचे जोरदार चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. येथे ११०-१२० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. १३ जूनच्या सकाळच्या सुमारास वाऱ्याचा वेग १३५ किलोमीटर प्रतितास असण्याचीही शक्यता आहे,' असे आयएमडीने म्हटले आहे.

सध्या या चक्रीवादळाचे केंद्र गोव्याच्या पश्चिम आणि नैऋत्येकडे ३५० किलोमीटरवर आहे. तर, मुंबईच्या दक्षिण नैऋत्येकडे ५१० किलोमीटरवर आणि वेरावलच्या (गुजरात) दक्षिणेला ६५० किलोमीटरवर आहे.

'चक्रीवादळ सौराष्ट्राचा किनारा पार करताना गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. आम्ही मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, किनाऱ्यावरून सुटणाऱ्या जहाजांना क्रमांक २ चा सिग्नल दिला आहे. चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मान्सून पोहोचण्यास उशीर लागू शकतो,' असे आयएमडी अहमदाबादचे संचालक जयंत सरकार यांनी सांगितले आहे.

भारतीय किनारपट्टी संरक्षक दल, नौदल, लष्कर आणि हवाई दल आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेत आपत्तीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Intro:Body:

cyclone vayu continues to move northwards may intensify in next 12 hours imd gujrat

cyclone vayu, intensify, imd gujrat, amit shah, disaster management

----------------

वायू चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले, १२ तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता

अहमदाबाद - वायू चक्रीवादळ १३ जूनला गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ उत्तरेकडे सरकत असून याची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.

'पुढील १२ तासांत हे वादळ रौद्र रूप धारण करू शकते. तसेच, हे गुजरातमध्ये आणि गुजरातच्या उत्तरेला प्रभाव टाकू शकते. गुजरातचे पोरबंदर आणि महुवा या किनाऱयांवर वेरावल आणि दीवच्या आजूबाजूच्या भागात याचे जोरदार चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. येथे ११०-१२० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. १३ जूनच्या सकाळच्या सुमारास वाऱ्याचा वेग १३५ किलोमीटर प्रतितास असण्याचीही शक्यता आहे,' असे आयएमडीने म्हटले आहे.

सध्या या चक्रीवादळाचे केंद्र गोव्याच्या पश्चिम आणि नैऋत्येकडे ३५० किलोमीटरवर आहे. तर, मुंबईच्या दक्षिण नैऋत्येकडे ५१० किलोमीटरवर आणि वेरावलच्या (गुजरात) दक्षिणेला ६५० किलोमीटरवर आहे.

'चक्रीवादळ सौराष्ट्राचा किनारा पार करताना गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. आम्ही मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, किनाऱ्यावरून सुटणाऱ्या जहाजांना क्रमांक २ चा सिग्नल दिला आहे. चक्रावादळामुळे गुजरातमध्ये मान्सून पोहोचण्यास उशीर लागू शकतो,' असे आयएमडी अहमदाबादचे संचालक जयंत सरकार यांनी सांगितले आहे.

भारतीय किनारपट्टी संरक्षक दल, नौदल, लष्कर आणि हवाई दल आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेत आपत्तीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.