ETV Bharat / bharat

भारत-चीन तणावापूर्वीच सायबर हल्ल्यांमध्ये वाढ: सायबर सुरक्षा तज्ज्ञ - भारत सायबर सुरक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातील माजी राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक डॉ. गुलशन राय यांनी ईटीव्ही भारतचे डेप्युटी न्यूज एडिटर कृष्णानंद त्रिपाठी यांच्याशी बोलताना सांगितले की, भारत आणि चीन संघर्षाच्या बातम्या आणि व्हिडीओ बाहेर येण्याच्या खूप अगोदरच सायबर हल्ल्यांना सुरवात झाली होती. तसेच मे महिन्याच्या सुरूवातीपासून लडाख प्रदेशात चिनी सैनिकांची हालचाल आढळून आली होती.

सायबर हल्ले
Cyber Attacks
author img

By

Published : Jul 11, 2020, 1:31 PM IST

नवी दिल्ली - मागील महिन्यात भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले झाले. त्यावेळी प्रामुख्याने, कोविड १९ ची मोफत चाचणी किंवा इतर प्रलोभने दाखवणाऱ्या संशयास्पद ई मेल्सवर क्लिक न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. लडाख भागातील गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य आणि चिनी पीएलए सैनिकांमध्ये हिंसक झटपट होऊन २० भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याच्या एका आठवड्यानंतर २१ जून रोजी केंद्र सरकारने या सूचना जारी केल्या होत्या. विशेष म्हणजे, दोन देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांना लक्ष्य करतील, अशी भीती अगोदरपासूनच व्यक्त केली जात होती. मात्र, देशातील वरिष्ठ पातळीवरील सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते सायबर हल्ल्यांच्या घटनेत अचानक झालेल्या वाढीस दोन मोठ्या आशियाई देशांमधील संघर्ष कारणीभूत नाही. 'वर्क फ्रॉम होम' म्हणजेच घरातून काम करत असताना मोठ्या प्रमाणात असुरक्षित उपकरणे वापरली गेल्याने नागरिक हॅकर्सच्या जाळ्यात अडकले आहेत.

“हे खरे आहे की, गेल्या दोन महिन्यात सायबर हल्ल्यांच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक पातळीवर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, काही लोकांच्या मते या हल्ल्यांमध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, हे हल्ले दोन देशांमधील तीव्र तणावामुळे झाले आहेत की यामागचे कारण काही वेगळेच आहे, हे शोधणे आवश्यक आहे, ” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातील माजी राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक डॉ. गुलशन राय यांनी म्हटले आहे.

“या सर्व हल्ल्यांवर नजर ठेवणाऱ्या 'सीईआरटी'मधील सायबर तज्ञांबरोबर मी चर्चा करून निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यानुसार, फिशिंग, विंशींग आणि रॅन्समवेअर या सर्व प्रकारच्या सायबर घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले, ”असे डॉ. राय यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. तसेच मे महिन्याच्या सुरूवातीपासून लडाख प्रदेशातील भारतीय आणि चिनी सैनिकांमधील वादविवादांच्या बातम्या आणि व्हिडिओ समोर येण्यापूर्वीच सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्ये केवळ दोन देशांमधील संबंध बिघडल्यामुळे वाढ झाली नसून फेब्रुवारी महिन्यापासून 'वर्क फ्रॉम होम'च्या प्रमाणात वाढ झाल्याने हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याचे, मुंबईतील इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम्स कंपनी ईपीएस इंडियाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये राय यांनी सांगितले होते.

“भारत-चीन तणावामुळे सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, असे दर्शवणारे कोणतेही ठळक पुरावे आत्तार्यंत समोर आले नसल्याचे राय यांनी स्पष्ट केले.

सायबर सुरक्षेपासून असुरक्षित बनवण्यास 'वर्क फ्रॉम होम' कारणीभूत -

देशातील सायबर सुरक्षेशी संबंधित आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अंतर्गत नोडल संस्था असलेल्या सीईआरटी-इन (इंडियन सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) चे अध्यक्ष राहिलेल्या डॉ. गुलशन राय यांच्या मते, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 'वर्क फ्रॉम होम'ची मोठ्या प्रमाणात आवश्यकता निर्माण झाली. मात्र, त्यानंतर सायबर समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

११ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ला जागतिक महामारी घोषित केली. त्यानंतर चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत संसर्गजन्य विषाणूमुळे भारतातील १९ हजार ७०० पेक्षा अधिक तर जगभरातील ५ लाख ३७ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे, अशी आकडेवारी वर्ल्डोमीटर (www.worldometers.info) ने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी २४ मार्च रोजी संपूर्ण देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच काही कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्यास सांगितले आहे. या अभूतपूर्व लॉकडाऊनमुळे लोकांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात मर्यादा येऊन वस्तूंची वाहतूक देखील विस्कळीत झाली. परिणामी देशातील अर्थव्यवस्था ठप्प झाली. तर ज्या क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' शक्य आहे, त्या क्षेत्रात लोकांनी घरून काम करण्यास सुरुवात केली. मात्र, 'वर्क फ्रॉम होम'च्या पर्यायामुळे सायबर हल्ल्याच्या घटनांमध्ये तीव्र वाढ झाली आहे.

“घरून काम करत असताना तुम्हाला जाणवले असेल की आपल्यापैकी कोणाकडेही सुरक्षित राऊटर नाही. मोबाइल किंवा लॅपटॉपवरून काम करताना आपले पासवर्ड / संकेतशब्द खुले आहेत," असे डॉ. गुलशन राय म्हणाले. ऑफिसने 'वर्क फ्रॉम होम'साठी दिलेले अॅप्लिकेशन्स घरून काम करण्यासाठी सक्षम नाहीत. या अगोदर 'वर्क फ्रॉम होम'साठी सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जात असे. परंतु, आत्ता घरुन काम करणाऱयांची संख्या अचानक वाढल्याने उपाययोजना करणे शक्य झाले नाही. परिणामी सायबर हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे," असे डॉ. राय यांनी नमूद केले.

डॉ. राय यांच्यामते, लोकांनी त्यांच्या इंटरनेट वापरामध्ये देखील सामाजिक अंतर आणि प्रतिबंधात्मकतेचे निकष पाळले पाहिजेत. सायबर हल्ले रोखण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सल्ल्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. यामध्ये मजबूत पासवर्ड निवडणे, पासवर्ड किंवा इतर सुरक्षासंबंधी माहिती इतरांबरोबर उघड न करणे, विश्वासू लोकांच्या पलीकडे कोणीही आपल्या होम लॅपटॉपमध्ये अनधिकृत प्रवेश करू नये याची खबरदारी घेणे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही संशयास्पद ईमेलवर क्लिक करू नये.

“आपल्याला आपल्या सर्व सिस्टिम्स सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. पंतप्रधान कार्यालयात नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिलेल्या डॉ. गुलशन राय यांच्या मते सायबर हल्ल्यांपासून दूर राहण्यासाठी आपण 'आयटी' वर्तनात देखील सामाजिक अंतर आणि प्रतिबंधनात्मकतेचे निकष पाळले पाहिजेत. देशातील सायबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरिकांवर होणारे सायबर हल्ले रोखण्यासाठी वेगवेगळ्या भागधारकांमध्ये समन्वय साधण्याचे काम डॉ. गुलशन राय करत होते.

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात वाढलेल्या तणावामुळे देखील सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली असू शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. “दोन देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सायबर हल्ल्यांमध्ये अजिबात वाढ झाली नाही, असे मी म्हणत नाही. अशा हल्ल्यांवर नजर ठेवणाऱ्या अनेक संस्था आहेत. या संस्थांनी हे हल्ले यशस्वीपणे रोखले आहेत,” असे डॉ. राय म्हणाले.

भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले किंवा हॅकिंगच्या घटना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून टिकटॉक, हेलो, शेअर-इट आणि कॅम स्कॅनरसारख्या ५९ चाईनीज मोबाईल अॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. “सरकारने बरीच बचावात्मक व प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. एजन्सीज प्रतिबंधात्मक पावले उचलत आहेत आणि आम्ही देखील पूर्णपणे सक्षम झाले आहोत, असे डॉ. राय म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.