ETV Bharat / bharat

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकविरोधी आंदोलन, गुवाहाटीत संचारबंदी शिथील - CitizenshipAmendmentAct

गुवाहटीमध्ये परिस्थिती सुधारत असल्यामुळे आज  सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत संचारबंदी शिथील करण्यात आली आहे.

गुवाहटीत संचारबंदी शिथील
गुवाहटीत संचारबंदी शिथील
author img

By

Published : Dec 15, 2019, 9:49 AM IST

गुवाहटी - ईशान्य भारतामध्ये नागरिकत्व विधेयकाविरोधात विविध निदर्शने सुरू आहे. आसाम, त्रिपुरामध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहेत. गुवाहाटीमध्ये परिस्थिती सुधारत असल्यामुळे आज सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना दिलासा मिळाला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला सुरू असलेल्या विरोधामुळे गुवाहाटीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येत असल्यामुळे संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. शहरात ब्रॉडबँड सेवा सुरु झाली असून इंटरनेट मात्र बंद आहे. शनिवारीदेखील सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत संचारबंदी शिथील करण्यात आली होती. दरम्यान आसामधील तिनसुकिया, दिब्रुगड आणि जोरहाट या अप्पर आसामच्या भागामध्ये अद्याप तणाव आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत पास झाले आहे. मात्र, या विधेयकाच्या विरोधात संपूर्ण ईशान्य भारत रस्त्यावर उतरला आहे. आंदोलनामुळे ईशान्येकडील राज्यांमधील जनजीवन ठप्प झाले आहे. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीमध्येही विधेयकाविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे लोण पश्चिम बंगालमध्येही पोहोचले असून, बेलदंगा रेल्वे स्थानकाला आंदोलकांनी पेटवल्याची माहिती आहे. केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी विधेयकाला विरोध दर्शवला आहे.

Intro:Body:

नागरिकत्व दुरूस्ती विधेयक आंदोलन, गुवाहटीत संचारबंदी शिथील

गुवाहटी - ईशान्य भारतामध्ये नागरिकत्व विधेयकाविरोधात विविध निदर्शने सुरू आहे. आसाम, त्रिपुरामध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहेत. गुवाहटीमध्ये परिस्थिती सुधारत असल्यामुळे आज  सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना दिलासा मिळाला आहे.

 नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला सुरू असलेल्या विरोधामुळे गुवाहाटीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.  परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येत असल्यामुळे संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. शहरात ब्रॉडबँड सेवा सुरु झाली असून इंटरनेट मात्र बंद आहे. शनिवारीदेखील सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत संचारबंदी शिथील करण्यात आली होती. दरम्यान  आसामधील तिनसुकिया, दिब्रुगड आणि जोरहाट या अप्पर आसामच्या भागामध्ये अद्याप तणाव आहे.  

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत पास झाले आहे. मात्र, या विधेयकाच्या विरोधात संपूर्ण ईशान्य भारत रस्त्यावर उतरला आहे. आंदोलनामुळे ईशान्येकडील राज्यांमधील जनजीवन ठप्प झाले आहे. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीमध्येही विधेयकाविरोधात आंदोलन सुरू आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.