ETV Bharat / bharat

ऑनलाईन अभ्यासासाठी स्मार्टफोन न मिळाल्याने मुलाची आत्महत्या - कडलूर ऑनलाईन शिक्षण बळी

ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन न मिळाल्याने कडलूर जिल्ह्यातील परुती गावात एका १४ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. विघ्नेश असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. विघ्नेशचे वडील विजय कुमार हे काजू विक्रेते आहेत.

suicide
आत्महत्या
author img

By

Published : Aug 1, 2020, 4:30 PM IST

चेन्नई(कडलूर) - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा ऑनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारी मुलभूत साधनेच उपलब्ध होत नाही. याच कारणातून कडलूर जिल्ह्यातील परुती गावात एका १४ वर्षीय मुलाने आत्महत्या केली.

विघ्नेश असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. विघ्नेशचे वडील विजय कुमार हे काजू विक्रेते आहेत. आपल्या इतर मित्रांप्रमाणे आपल्यालाही ऑनलाईन अभ्यासासाठी स्मार्टफोन हवा असल्याची मागणी विघ्नेशने विडिलांकडे केली होती. काजू विक्रीतून पैसे जमा झाल्यानंतर फोन घेऊन देण्याचे आश्वासन त्याच्या वडिलांनी दिले होते.

फोन नसल्याने ऑनलाईन शिकवणी घेता येत नाही. त्यामुळे आपण अभ्यासात मागे राहू या तणावातून आईच्या साडीने गळफास लावत विघ्नेशने आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी कुठलीही सुसाई़ड नोट सापडली नाही.

दरम्यान, गुरुवारी तामिळनाडू सरकारने ऑनलाईन शिक्षणाबाबत काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतही काही सूचना आहेत. नवीन नियमांनुसार ऑनलाईन शिकवण्याचा कालावधी कमी करून ३० ते ४५ मिनिटांपर्यंत आणला आहे. तर दोन शिकवण्यांच्या दरम्यान १० ते १५ मिनिटांची सुटी दिली जाणार आहे जेणकरून विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना आराम मिळावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.