कोलकाता - देशात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून अनेक कोरोनाचे रुग्ण पळून जाण्याच्या धक्कादायक घटना सु्दधा घडल्या आहेत. रविवारी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांला रूग्णालयात नेत असताना, त्याने रुग्णवाहिकेतून पळ काढल्याची घटना घडली आहे.
कोरोना पॉ़झिटिव्ह आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीला काल रात्री त्रिबेणी रुग्णालयता हलविण्यात येत होते. रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दिशेने जात असताना, रुग्णांने आराम करू इच्छित असल्याचे सांगून वाहन थांबवण्यास सांगितले. त्यानंतर तो जवळच्या जंगलात पळून गेला, असे रुग्णावाहिका चालकाने सांगितले.
दरम्यान जोरेबंगला पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, रुग्णांचा शोध घेण्यात त्यांना यश आले नाही.
दरम्यान, हा माणूस नुकताच पॅरोलवरुन तुरूंगातून सुटला होता, हे नंतर उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फरार कोरोना रुग्णांवर पत्नीच्या हत्येचा आरोप आहे. न्यायालयाने त्याला आठवड्यापूर्वी एक महिन्यासाठी पॅरोल मंजूर केले होते.