ETV Bharat / bharat

COVID-19 Updates : देशभरातील कोरोनासंबंधीच्या सर्व घडामोडी; वाचा एका क्लिकवर.. - India corona live updates

COVID-19 Updates LIVE
COVID-19 Updates LIVE : देशभरातील कोरोनासंबंधीच्या सर्व घडामोडी; वाचा एका क्लिकवर..
author img

By

Published : May 6, 2020, 10:17 AM IST

Updated : May 6, 2020, 8:43 PM IST

20:08 May 06

तामिळानाडूमधील रुग्णसंख्या पाच हजारांच्या घरात..

चेन्नई - तामिळनाडूमध्ये आज एका दिवसात ७७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४,८२९वर पोहोचली आहे. आज झालेल्या २ मृत्यूंनंतर आता राज्यातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३५वर पोहोचली आहे.

19:24 May 06

गुड न्यूज..! कोरोनावर लस शोधल्याचा इटलीत दावा, उंदरावरील प्रयोग यशस्वी

रोम (इटली) - सर्वत्र दहशत माजवलेल्या कोरोना विषाणूवर औषध शोधण्याचा जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. आता इटालियन संशोधकांनी दावा केला आहे की, त्यांनी कोरोनावर एक यशस्वीरित्या लस विकसित केली आहे. कोरोनाबाधित रुग्णावर त्याची चाचणी घेण्याची शक्यता आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.

19:18 May 06

अहमदाबादमध्ये उद्यापासून १५ मे पर्यंत मोठा बंद; केवळ दूध आणि औषधविक्री राहणार सुरू..

गांधीनगर - गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज रात्रीपासून सर्व दुकाने बंद राहणार आहेत. केवळ दूध आणि औषध पुरवठा करणारी दुकानेच सुरू राहणार आहेत. आज रात्री १२ ते १५ मे सकाळी सहा वाजेपर्यंत हा नियम लागू राहणार असल्याचे अहमदाबाद महानगरपालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

17:17 May 06

केरळमध्ये आज एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही, अ‌ॅक्टिव रुग्णांच्या संख्येतही घट..

तिरुवअनंतपुरम - केरळ राज्यामध्ये आज दिवसभरात एकाही नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५०२च राहिली आहे. यांपैकी केवळ ३० रुग्ण हे अ‌ॅक्टिव असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली आहे.

17:17 May 06

COVID19: अत्यावश्यक औषधांचा पर्याप्त साठा ठेवा... केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेला आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक औषधे आणि इतर काही महत्त्वाच्या औषधांचा पर्याप्त साठा ठेवा, असे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट अ‌ॅन्ड ड्रगिस्ट संघटनेला लिहले आहे. महामारीच्या कठीण काळात औषधांचा पर्याप्त साठा ठेवण्याचे आवाहन पुरवठादार आणि केमिस्ट दुकानदारांना मंत्रालयाने केले आहे.

17:17 May 06

कोरोना : कर्नाटकमध्ये आणखीन २० बाधित रुग्ण आढळले, एकूण रुग्ण संख्या ६९३

बंगळुरू - कोरोनाचे रुग्ण देशभरात वाढतच आहेत. कर्नाटक राज्यात आज नवीन २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील बाधितांचा आकडा ६९३ वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य विभागाने आज दिली. यांपैकी ३५४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

17:09 May 06

पश्चिम बंगालमध्ये एका दिवसात आढळले ११२ नवे रुग्ण..

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ११२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,४५६वर पोहोचली आहे. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ४ नव्या बळींची नोंद झाली आहे, त्यामुळे राज्यात कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ७२वर पोहोचली आहे.

राज्यात सध्या १० सरकारी आणि ५ खासगी प्रयोगशाळा कोरोनाची चाचणी करत आहेत. दररोज साधारणपणे २,५०० लोकांची चाचणी केली जात आहे, अशी माहिती राज्याचे गृहसचिव अल्पन बंदोपाध्याय यांनी दिली आहे.

14:51 May 06

उत्तर प्रदेशमध्ये मोठी दरवाढ, दारू अन् पेट्रोलच्या किंमती वाढल्या..

लखनऊ - उत्तर प्रदेश सरकारने पेट्रोल आणि दारुच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पेट्रोलची किंमत दोन रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत एक रुपये प्रति लिटर वाढवण्यात आली आहे.

यासोबतच, राज्यात देशी दारुच्या दरांमध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच, विदेशी दारुच्या १८० मिलीलीटरच्या बाटलीवर १० रुपये, १८० ते ५०० मिलीलीटरच्या बाटलीवर २० रुपये आणि ५०० मिलीलीटरहून अधिक क्षमतेच्या बाटलीवर ३० रुपये जादा दर लागू करण्यात आले आहेत.

यासोबतच, विदेशातून आयात झालेल्या दारुच्या १०० ते १८० मिलीलीटरच्या बाटलीव १००, १८० ते ५०० मिलीलीटरच्या बाटलीवर २०० रुपये, तर  ५०० मिलीलीटरहून अधिक क्षमतेच्या बाटलीवर ४०० रुपये जादा दर लागू करण्यात आले आहेत. हे सर्व दर आज रात्री १२ नंतर लागू होणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी दिली आहे.

14:30 May 06

लॉकडाऊनवाली लव्हस्टोरी : 'तो' शेकडो किलोमीटर पायपीट करून 'ति'ला भेटला..

रत्नागिरी - आयुष्यभर एकमेकांची साथ देणारे, रुढी, प्रथा, चालिरीतीविरोधात संघर्ष करून एकत्र आलेले प्रेमीयुगुल आपण चित्रपटांतून नेहमीच बघतो. मात्र, तसाच अनुभव मुंबईतील प्रेमीयुगलांबाबत आला आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रेयसीच्या ओढीने मुंबईतील तरुण पोलिसांची नजर चुकवत चक्क पायी प्रवास करत, मिळेत ते वाहन पकडत सिंधुदुर्गात पोहोचल्याचे समोर आले आहे. मात्र, तरुणीला घेऊन परत जाताना रत्नागिरी पोलिसांनी या दोघांनाही पकडून क्वारंटाईन केले आहे.

सविस्तर वाचा : 'तो' शेकडो किलोमीटर पायपीट करून 'ति'ला भेटला..

14:29 May 06

'छत्री नाही, तर दारु नाही'..

तिरुपूर - लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर देशातील अनेक राज्यात मद्यविक्री सुरू झाली आहे. मात्र, दारु खरेदी करताना नागरिक मोठी गर्दी करत आहेत. अनेक वेळा गोंधळ उडाल्याने पोलिसांना लाठीचार्जही करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जातात. यावर तामिळनाडू राज्यातील तिरुपूर जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनव उपाय शोधला आहे.

सविस्तर वाचा : 'छत्री नाही, तर दारु नाही',  तामिळनाडू सरकारने यासाठी घेतला हा निर्णय

14:24 May 06

आंध्र प्रदेश : गुंटूरमध्ये दारूचे दुकान बंद करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

गुंटूर (आंध्र प्रदेश) - येथील माछावरम मंडळातील पिल्लुतला गावच्या लोकांनी मंगळवारी उघडलेल्या दारूच्या दुकानासमोर आंदोलन केले. या लोकांनी हे दुकान बंद करण्याची जोरदार मागणी केली. तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करताना शासनाने व्यवसायांना काही प्रमाणात सूट दिली आहे. मात्र, यानंतर दारूचे दुकान सुरू झाल्यानंतर लोकांनी याला एकजुटीने विरोध केला. या वेळी, ग्रामस्थांनी प्रकरण नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांशीही जोरदार वादावादी केली.

सविस्तर वाचा : गुंटूरमध्ये दारूचे दुकान बंद करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

14:23 May 06

मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे वैध समजली जाणार - केंद्रीय वाहतूक मंत्रालय

नवी दिल्ली - देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने वाहनांच्या कागदपत्रांचे नुतनीकरण, वैधता आणि इतर कामे रखडली आहेत. त्यामुळे मुदत संपलेली कागदपत्रेही वैध ठरविण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. ३० जूनपर्यंत कागदपत्रांची वैधता वाढविण्यात आली आहे.

सविस्तर वाचा : COVID-19: मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे वैध समजली जाणार

14:22 May 06

43 दिवसांची प्रतीक्षा...तेलंगाणात दारूच्या दुकानाबाहेर मद्यपींच्या लांबच लांब रांगा

हैदराबाद- तेलंगाणा राज्यात 43 दिवसांनंतर सुरु झालेल्या दारुच्या दुकानाबाहेर मद्यपींनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र होते. 33 जिल्ह्यातील 2 हजार दारुविक्रीची दुकाने आज सुरु झाल्यानंतर मद्यपींनी दुकानाबाहेर मोठ्या रांगा लावल्या.

सविस्तर वाचा : 43 दिवसांची प्रतीक्षा...तेलंगाणात दारूच्या दुकानाबाहेर मद्यपींच्या लांबच लांब रांगा

14:08 May 06

सरकारकडे कोरोनाशी लढण्यासाठी काही विशेष योजना आहे का; काँग्रेस बैठकीत केला सवाल..

नवी दिल्ली - कोरोनाशी लढण्यासाठी सरकारकडे काही विशेष योजना आहे का, हे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला विचारायला हवे असे मत देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. ते काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. 

दरम्यान, या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी "१७ मे नंतर काय करायचे, आणि '१७ मे'च का? सरकार लॉकडाऊनचा काळ ठरवण्यासाठी कोणते निकष ग्राह्य धरत आहे?" असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

14:02 May 06

बीएसएफचे आणखी तीस जवान कोरोना 'पॉझिटिव्ह'..

जयपूर - सीमा सुरक्षा दलाच्या आणखी तीस जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीमध्ये कार्यरत असलेल्या या जवानांंची पोस्टिंग नुकतीच जोधपूरला झाली होती. जोधपूरमध्ये त्यांची तपासणी केली असता, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

13:56 May 06

हरियाणामध्ये दुपारपर्यंत सात नव्या रुग्णांची नोंद, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५५५

चंदीगड - हरियाणामध्ये आज दुपारपर्यंत कोरोनाच्या सात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातीत एकूण रुग्णांची संख्या ५५५वर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

13:43 May 06

तामिळनाडूमधील दारुचा दर वाढला..

चेन्नई - तामिळनाडू सरकारने भारतात बनलेल्या विदेशी मद्यावर १५ टक्के उत्पादन शुल्क लागू केले आहे. यासोबतच, साध्या ब्रँड्सच्या १८० मिलीलीटरच्या बाटलीवर दहा रुपये तर प्रिमियम ब्रँड्सवर २० रुपये दरवाढ लागू करण्यात आली आहे. राज्यातील कन्टेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी ७ मे पासून मद्यविक्री सुरू होणार आहे.

13:28 May 06

तब्बल १६०० कोटींचे कोरोना विशेष पॅकेज; कर्नाटकातील सुमारे दहा लाख लोकांना मिळणार प्रत्येकी पाच हजार रुपये..

बंगळुरू - कर्नाटक सरकारने कोरोनाशी लढा देण्यासाठी १,६१० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. राज्यातील २ लाख तीस हजार नाभिकांना, आणि सात लाख ७५ हजार चालकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

12:53 May 06

कर्नाटकमधील रुग्णांची संख्या सातशेच्या घरात, आतापर्यंत २९ मृत्यू..

बंगळुरू - कर्नाटकमध्ये गेल्या १६ तासांमध्ये कोरोनाचे १६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ६९२वर पोहोचली आहे. यांपैकी ३४५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, राज्यात आतापर्यंत २९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

12:49 May 06

महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक; केंद्रीय आरोग्यमंत्री करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा..

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रसार कसा थांबवता येईल याबाबत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज दुपारी चर्चा करणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

12:47 May 06

पोलिसी दणका..! महाराष्ट्रात 93 हजार आरोपींवर गुन्हा, तर 18 हजार जणांना अटक

मुंबई- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. भारतात सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनसह संचारबंदी लागू आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासन वारंवार आवाहन करीत आहे. मात्र, नागरिक आवाहनाची पायमल्ली करीत रस्त्यावर पडत आहेत. राज्यभरात 22 मार्च ते 4 मे या काळात 93 हजार 731 गुन्हे दाखल झाले असून 18 हजार 466 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. होम क्वारंटाईन आणि संचारबंदीचा नियम मोडणाऱ्या 633 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

12:47 May 06

शेतमाल खरेदी- विक्रीसाठी आंध्रप्रदेशनं लॉन्च केलं मोबाईल अ‌ॅपलिकेशन

अमरावती - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोबाईल आधारीत अ‌ॅपचे अनावरण केले. कॉप्रिहेन्सिव्ह मॉनिटरींग ऑफ अ‌ॅग्रिकल्चर, प्राईज अ‌ॅड प्रॉक्यूरमेंट (CMAPP) असे या अ‌ॅपला नाव देण्यात आले आहे. या अ‌ॅपद्वारे शेतकऱ्यांना मालाच्या किंमती, विक्री, बाजार यांची माहिती मिळणार आहे, तसेच सरकारलाही कृषीक्षेत्राशी निगडीत खरेदी विक्रीचे निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

सविस्तर वाचा : शेतमाल खरेदी- विक्रीसाठी आंध्रप्रदेशनं लॉन्च केलं मोबाईल अ‌ॅपलिकेशन

12:46 May 06

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ३७ लाखांवर.. मृतांची संख्या अडीच लाख

हैदराबाद - जगभरामध्ये ३७ लाख २७ हजार ८०२ पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर २ लाख ५८ हजार ३३८ पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे विविध देशांत १२ लाख ४२ हजार ३४७ रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेमध्ये झाले आहेत.

12:46 May 06

हम होंगे कामयाब..! 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले...

ठाणे- कोरोना या महाभयंकर महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले असून महाराष्ट्रात देखील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना म्हणजे मृत्यूच असा काही नागरिकांचा समज झाला आहे. मात्र, कोरोना म्हणजे मृत्यू, असे काही नसून अनेक कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. याचेच उत्तम उदाहण ठाण्यात बघायला मिळाले. येथे एका 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाबर मात केली आहे.

12:45 May 06

खासगी डॉक्टरांनो सेवा द्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा, राज्य सरकारचा आदेश

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत असून या काळात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवेची गरज भासत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी ही कोविड-19 च्या रुग्णालयात सेवा द्यावी, असा आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाने काढला आहे.

12:45 May 06

मुंबईमधील कोरोना रुग्ण पळाला...शोधासाठी पोलीस पथक कार्यरत

मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यातील रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच येथील जी.टी रुग्णालयातून कोरोनाचा रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना हा रुग्ण पळून गेला आहे.

11:54 May 06

दिल्लीच्या कल्याणपुरीमध्ये दारुच्या दुकानाबाहेर तब्बल एक किलोमीटर लांब रांग पहायला मिळाली..

11:50 May 06

कर्नाटकने आतापर्यंत एक लाखांहून अधिक कामगारांना पोहोचवले त्यांच्या राज्यात..

बंगळुरू - कर्नाटक सरकारने आतापर्यंत जवळपास एक लाखांहून अधिक स्थलांतरीत मजूरांना आपापल्या राज्यांमध्ये परत पाठवले आहे. सुमारे ३,५०० बसेसचा आणि रेल्वेचा यासाठी वापर करण्यात आला आहे. यासोबतच, मी या कामगारांना राज्यात थांबण्याचे आवाहन केले आहे, कारण आता बांधकामे हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी दिली आहे.

11:41 May 06

दिल्लीतील रुग्णांची संख्या पाच हजारांवर..

नवी दिल्ली - काल दिवसभरात दिल्लीमध्ये २०६ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५,१०४वर पोहोचली आहे. आतापर्यंत १,४६८ रुग्णांवर उपचार यशस्वी झाले असून, १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

11:36 May 06

आंध्र प्रदेशमधील रुग्णांची संख्या १,७७७वर, राज्यात आतापर्यंत ३६ लोकांचा बळी..

अमरावती - आंध्र प्रदेशमध्ये गेल्या १२ तासांमध्ये ६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामधील १२ गुजरातचे, तर १ कर्नाटकचा नागरिक आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७७७ वर पोहोचली असून, त्यांपैकी १,०१२ रुग्ण अ‌ॅक्टिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आतापर्यंत राज्यातील ७२९ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, एकूण ३६ लोकांचा बळी गेला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

10:48 May 06

नवी मुंबईहून मध्य प्रदेशला श्रमिक विशेष रेल्वे रवाना; १२ हजार मजूर जाणार घरी..

मुंबई - नवी मुंबईमधून सुमारे १,२०० स्थलांतरीत कामगारांना घेऊन एक श्रमिक विशेष रेल्वे मध्यप्रदेशला रवाना झाली आहे. पनवेलहून आज पहाटे निघालेली ही गाडी एमपीच्या रेवा जिल्ह्यात जाणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

10:41 May 06

'आरोग्य सेतू अ‌ॅप डाउनलोड करा', गौतमबुद्धनगर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नवी दिल्ली - कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे मोबाईल आधारित अ‌ॅप विकसित केले आहे. सध्या केंद्र सरकार सगळ्यांना आरोग्य सेतू अ‌ॅप वापरण्याचे आवाहन करत आहे. गौतमबुद्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल. वाय यांनीही लोकांना आरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्याचे आवाहन केले.

10:30 May 06

नोएडामध्ये रस्त्यावर थुंकाल तर होईल १००० रुपये दंड!

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घातली गेली आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा रस्त्यावर थुंकताना आढळल्यास एक हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

09:34 May 06

कोरोनाचा कहर...अमेरिकेत 70 हजाराहून अधिक लोकांचा बळी

वॉशिंग्टन - संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून सध्यपरिस्थितीत कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार अमेरिकेमध्ये झाला आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 2 हजार 333 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्सकडून ही माहिती देण्यात आली आहे.

09:34 May 06

लॉकडाऊनचा असाही फायदा; नर्मदा नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली

नवी दिल्ली - लॉकडाऊन'मुळे नागरिक घरात आहेत. रस्त्यावर केवळ आवश्यक कामासाठी बाहेर निघणार्‍या व्यक्ती आहेत. शहरातील रस्ते पूर्णत: निर्जन झाले आहेत. याचा फायदा देशातील धार्मिकदृष्ट्या पवित्र नर्मदा नदीला झाला आहे. नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली असून पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाणही जास्त आहे.

09:34 May 06

सोनिया गांधी काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत आज संवाद साधणार

नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील परिस्थितीचा आणि राज्यात कोरोना संकटावर काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.

09:33 May 06

कोरोना : तेलंगाना राज्यातील लॉकडाऊन 29 मेपर्यंत वाढवला

हैदराबाद - कोरोनाचा प्रसार अद्याप थांबलेला नसल्याने तेलंगाना राज्यातील लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २९ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवणारे तेलंगाणा देशातील पहिले राज्य ठरले आहे.

09:04 May 06

 नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या घरात पोहोचली आहे. आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे एकूण ४९,३९१ रुग्ण आहेत. यामधील ३३,५१४ रुग्ण हे अ‌ॅक्टिव आहेत, तर आतापर्यंत एकूण १४,१८२ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १,६९४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Last Updated : May 6, 2020, 8:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.