गांधीनगर - गुजरातमध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ३३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५,५०४वर पोहोचली आहे. यांपैकी ८९६ रुग्णांवरील उपचार यशस्वी झाले आहेत. तर, आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात २६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
COVID-19 Updates : कोरोना अन् लॉकडाऊन संबंधीच्या देशभरातील बातम्या; वाचा एका क्लिकवर.. - COVID-19 tracker LIVE
20:07 May 02
गुजरातमध्ये एका दिवसात ३३३ रुग्णांची नोंद, राज्यातील संख्या साडेपाच हजारांवर..
19:43 May 02
तामिळनाडूमध्ये २३१ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण संख्या पोहोचली २,७५७वर..
चेन्नई - राज्यात आज २३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २,७५७ वर पोहोचली आहे. यासोबतच आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे १,३८४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण २९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
19:36 May 02
आठ वर्षाचा चिमुरडा करतोय मास्कचे वाटप..
गाझियाबाद - उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील लोणी भागात राहणाऱ्या तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने कोरोनाच्या लढ्यात पुढाकार घेतला आहे. या लहान मुलाने आपल्या घरी मास्क तयार करुन त्याचे घरोघरी मोफत वाटप केले. मानव कसाना असे त्या 8 वर्षाच्या मुलाचे नाव आहे.
सविस्तर वाचा : 8 वर्षाच्या चिमुकल्याचा कोरोनाच्या लढ्यात पुढाकार, घरोघरी मास्कचे मोफत वाटप
19:32 May 02
अमेरिकेतील लॉकडाऊन शिथील..
वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत ११ लाख ३१ हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. मात्र, तरीही देशातील १२ पेक्षा जास्त राज्यांनी लॉकडाऊन शिथिल केला आहे. अर्थव्यवस्था ढासळू न देण्यासाठी विविध राज्यांनी हा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वाचा : कोरोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला तरीही लॉकडाऊन शिथिल
19:21 May 02
पंजाबमध्ये आज आढळले १८७ नवे रुग्ण; राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ७७२वर..
चंदीगड - पंजाबमध्ये आज दिवसभरात एकूण १८७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यांमधील ५३ रुग्ण हे अमृतसरचे आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ७७२वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
19:12 May 02
कर्नाटकात कंटेन्मेंट झोन वगळता सगळीकडे मिळणार दारू; सोमवारपासून अंमलबजावणी..
बंगळुरू - सोमवारपासून कर्नाटकातील कंटेन्मेट झोन वगळता सर्व भागांमधील दारूची दुकाने उघण्यात येणार आहेत. केवळ स्वतंत्र दारूच्या दुकानांनाच विक्री करण्याची परवानगी मिळणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठराविक अटींवर ही दुकाने सुरू करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री एच. नागेश यांनी दिली.
19:09 May 02
उद्यापर्यंत सर्व उद्योग सुरू होतील, कामगारांनी घरी जाण्याची घाई करू नका - हरियाणा मुख्यमंत्री
चंदीगड - राज्यामधील उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. तसेच, जे उद्योग सुरू नाहीत झाले तेदेखील उद्यापासून सुरू होतील. त्यामुळे परराज्यातील कामगारांनी आपापल्या राज्यांमध्ये परत जाण्याची घाई करू नये, असे आवाहन हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी केले आहे. स्थलांतरित मजूरांना राज्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासनदेखील त्यांनी यावेळी दिले.
18:24 May 02
हिमाचल प्रदेशमध्ये ३३ रुग्णांवर उपचार यशस्वी; राज्यात उरले केवळ २ अॅक्टिव कोरोना रुग्ण..
शिमला - हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत ३३ कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत चार रुग्णांनी स्थलांतर केल्यामुळे राज्यामध्ये कोरोनाचे केवळ दोन अॅक्टिव रुग्ण शिल्लक राहिले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.
18:22 May 02
हरियाणामध्ये आज आढळले १९ नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३७६वर..
चंदीगड - हरियाणामध्ये आज दिवसभरात १९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३७६वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्यविभागाने याबाबत माहिती दिली. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
18:19 May 02
केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडणार..
डेहराडून - राज्यातील भाविक ४ मेपासून केदारनाथ आणि इतर हिमालयीन भागात असलेल्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी येऊ शकतात, असे राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी शनिवारी सांगितले.
हेही वाचा : ४ मेपासून केदारनाथ मंदिर राज्यातील भाविकांसाठी खुले - मुख्यमंत्री
18:17 May 02
१२ दिवसांच्या 'प्रकृती'ने केली कोरोनावर मात..
भोपाळ - शहरातील कोरोनाग्रस्त १२ दिवसाच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारानंतर प्रकृती स्थिर झाल्यामुळे सदर मुलीला घरी सोडण्यात आले, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
सविस्तर वृत्त : सुखद : १२ दिवसाच्या मुलीने कोरोनाविरोधातील लढा जिंकला
17:32 May 02
तामिळनाडूमध्ये अडकलेले विस्थापित कामगार रस्त्यावर; आपापल्या राज्यांमध्ये परत पाठवण्याची केली मागणी..
चेन्नई - आपल्याला आपापल्या राज्यांमध्ये परत पाठवावे, अशी मागणी करत चेन्नईमधील शेकडो कामगार रस्त्यावर उतरले होते. मोगाप्पैर भागामध्ये आज दुपारी हा प्रकार घडला. प्रशासनाने या सर्व कामगारांना आश्वासन दिल्यानंतर ते शेल्टर होम्समध्ये परत गेले.
17:26 May 02
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी मागितले रेल्वे मंत्र्यांचे आभार; श्रमिक रेल्वे मोफत करण्याची केली मागणी..
रायपूर - छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहित विषेश श्रमिक रेल्वे सुरू केल्याबद्दल आभार मागितले आहेत. यासोबतच, त्यांनी कामगारांसाठी चालवल्या जाणाऱ्या या रेल्वे गाड्या निःशुल्क कराव्यात अशी विनंतीही केली आहे.
17:16 May 02
केंद्र सरकारने दिली ११.४५ कोटी हायड्रॉक्सिक्लोरोक्वाईन गोळ्यांची ऑर्डर..
नवी दिल्ली - केंद्र सरकारने ११ कोटी ४५ लाख हायड्रॉक्सिक्लोरोक्वाईन गोळ्यांची तातडीने मागणी केली आहे. देशातील औषध निर्मिती करणाऱ्या आयपीसीए लॅबोरेटोरीज आणि झायडस कॅडिला या दोन कंपन्यांना सरकारने याबाबत ऑर्डर दिली आहे.
17:10 May 02
भारतीय नौदलामधील १२ कोरोना रुग्णांवरील उपचार यशस्वी..
नवी दिल्ली - देशाच्या नौदलामधील ३८ जवानांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांपैकी १२ जवानांवरील उपचार यशस्वी झाले असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. नौदलाचे चीफ व्हाईस अॅडमिरल जनरल अशोक कुमार यांनी याबाबत माहिती दिली. हे सर्व मुंबईमधील आयएनएस आंग्रेमधील होते. तसेच, देशाच्या एकाही युद्धनौका किंवा पाणबुडीमध्ये कोरोना संक्रमित जवान नसल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
15:51 May 02
देशातील कृषी क्षेत्रातील सुधारांबाबत पंतप्रधानांनी बोलावली बैठक..
नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज कृषी क्षेत्रातील आवश्यक मुद्द्यांबाबत व सुधारणांवर विचारविनिमय करण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेती विपणन क्षेत्रातील सुधारणा, विपणन शिल्लक अतिरिक्त व्यवस्थापन, शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठा आणि क्षेत्रातील विविध निर्बंध हटवण्यावर विशेष भर देण्यात आला.
15:42 May 02
कोरोना पॉझिटिव्ह परिचारिकेने रुग्णालयावर केले गंभीर आरोप; पहा व्हिडिओ..
हरियाणा- गुरुग्राम जिल्ह्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांनी सरकार व प्रशासनाच्या यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. गुरुग्राम सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणाऱ्या 2 परिचारिकांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली. आणि या दोन्ही परिचारिकांवर गुरुग्राममधील सेक्टर -9 ईएसआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त : कोरोना पॉझिटिव्ह नर्सचा व्हिडिओ व्हायरल.. रुग्णालय प्रशासनावर केले आरोप
15:40 May 02
लॉकडाऊन : सायकलवर स्वतःच्या राज्यात जात होता कामगार; रस्त्यात झाला मृत्यू..
लखनऊ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. या दरम्यान देशाच्या अनेक भागात विविध राज्यांतील कामगार अडकून पडले आहेत. लॉकडाऊनला कंटाळून अनेक कामगारांनी पायी आणि सायकलवर घरचा रस्ता धरला आहे. अशाच एका कामगाराचा उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरमध्ये मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त : सायकलवर घरी निघालेल्या कामगाराचा मृ्त्यू; उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमधील घटना
15:38 May 02
विनापरवानगी बिहारला जाणारे एक हजार लोक उत्तर प्रदेशमध्ये 'क्वारंटाईन'..
जालौन (उत्तर प्रदेश) - महाराष्ट्रातून बिहारकडे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता जाणाऱ्या सुमारे एक हजार परप्रांतीय कामगारांना उत्तर प्रदेश येथील जालौन जिल्ह्यातील कलपी गावातील यमुना नदीच्या पुलावर अडविण्यात आले आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून त्या सर्व मजुरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त : महाराष्ट्रातून बिहारला निघालेले हजार मजूर उत्तर प्रदेशात 'क्वारंटाईन'
15:37 May 02
ट्रकमधून उत्तर प्रदेशला जाणारे ३६ कामगार ताब्यात..
लखनौ- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. या दरम्यान देशाच्या अनेक भागात विविध राज्यांतील कामगार अडकून पडले आहेत. त्याठिकाणचे प्रशासन कामगारांची राहण्या-खाण्याची सोय करीत आहे. मात्र, तरीही कामगारांचा धीर सुटत असल्याने कामगार घरी जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता छुप्या पद्धतीने मालवाहतून गाड्यातून प्रवास करीत आहेत.
सविस्तर वृत्त : ट्रकमधून प्रवास करणारे 36 कामगार पकडले... जात होते महाराष्ट्रातून युपीला
15:34 May 02
त्रिपुरामध्ये बीएसएफच्या दोन जवानांना कोरोनाची लागण..
आगरतळा - त्रिपुरा राज्यातील अंबासामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. यांपैकी आज आढळून आलेले दोन रुग्ण अॅक्टिव्ह असून, यापूर्वीच्या दोन रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.
15:28 May 02
२०२२ पर्यंत असणार कोरोनाचा कहर..?
वॉशिंग्टन - कोरोना विषाणूमुळे पसरलेली महामारी 2022 पर्यंत सुरू राहू शकते. तसेच, जगातील बहुतांश लोकसंख्येला प्रतिबंधात्मक उपाय मिळून त्यांची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत झाल्याशिवाय या महामारीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मिनेसोटा विद्यापीठातील संसर्गजन्य आजार संशोधन केंद्राकडून याबाबतचा अहवाल समोर आला आहे.
सविस्तर वृत्त : कोरोना विषाणूमुळे पसरलेली महामारी 2022 पर्यंत चालेल - अमेरिकन संशोधन
14:20 May 02
दिल्लीच्या ८०० विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी ४० बसेस कोटामध्ये दाखल..
नवी दिल्ली - दिल्ली परिवाहन मंडळाच्या ४० बस गाड्या आज कोटामध्ये पोहोचल्या आहेत. गुजरातमध्ये अडकलेल्या ८०० विद्यार्थ्यांना घेऊन या बसेस परत येतील. यावेळी एका बसमध्ये २०हून अधिक विद्यार्थी बसणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांची गुजरात आणि दिल्लीमध्येही तपासणी केली जाणार असल्याची माहिती दिल्लीचे परिवाहन मंत्री कैलाश गहलोत यांनी दिली आहे.
14:15 May 02
चक्क सिमेंट मिक्सरमध्ये बसून लखनऊला चालले होते १८ लोक; इंदूर पोलिसांनी केली अटक..
-
#WATCH 18 people found travelling in the mixer tank of a concrete mixer truck by police in Indore, Madhya Pradesh. DSP Umakant Chaudhary says, "They were travelling from Maharashtra to Lucknow. The truck has been sent to a police station & an FIR has been registered". pic.twitter.com/SfsvS0EOCW
— ANI (@ANI) May 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH 18 people found travelling in the mixer tank of a concrete mixer truck by police in Indore, Madhya Pradesh. DSP Umakant Chaudhary says, "They were travelling from Maharashtra to Lucknow. The truck has been sent to a police station & an FIR has been registered". pic.twitter.com/SfsvS0EOCW
— ANI (@ANI) May 2, 2020#WATCH 18 people found travelling in the mixer tank of a concrete mixer truck by police in Indore, Madhya Pradesh. DSP Umakant Chaudhary says, "They were travelling from Maharashtra to Lucknow. The truck has been sent to a police station & an FIR has been registered". pic.twitter.com/SfsvS0EOCW
— ANI (@ANI) May 2, 2020
भोपाळ - मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये पोलिसांनी चक्क सिमेंट मिक्सरमधून प्रवास करणाऱ्या १८ जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रातून हे १८ लोक लखनऊला चालले होते. पोलिसांनी या १८ जणांवर गुन्हा दाखल केला असून, हा ट्रकही ताब्यात घेतला आहे.
13:23 May 02
कर्नाटकातील कोरोना रुग्णांची संख्या ५९८वर; आतापर्यंत २५ जणांचा बळी..
बंगळुरू - कर्नाटकमध्ये गेल्या १८ तासांमध्ये कोरोनाचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५९८ वर पोहोचली असून, राज्यात आतापर्यंत २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
12:42 May 02
दिल्लीच्या एकाच इमारतीतील ४१ जणांना कोरोनाची लागण!
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एकाच इमारतीतील ४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कापाशेरा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असणाऱ्या 'ठेकेवाली गली'मधील ही इमारत आहे. १९ एप्रिललाय या इमारतीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर ही इमारत सील करण्यात आली होती.
12:05 May 02
'४ मे' नंतर निम्मा देश होईल पूर्णपणे कार्यरत - प्रकाश जावडेकर..
नवी दिल्ली - देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपण बऱ्याच प्रमाणात कोरोनच्या प्रसारावर आळा घातला आहे. चार मे नंतर जवळपास निम्मा देश पूर्णपणे कार्यरत होईल, असे मत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे.
12:02 May 02
तेलंगाणामध्ये आढळले ६२ नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या पोहोचली १,५२५वर..
हैदराबाद - तेलंगाणामध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे ६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १,५२५ वर पोहोचली आहे. तसेच, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
12:00 May 02
विविध राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरीत मजूर घरी रवाना..
नवी दिल्ली - आतापर्यंत पाच रेल्वे गाड्या स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि इतर लोकांना त्यांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी रवाना झाल्या आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. संबंधित राज्य सरकारच्या विनंतीवरून या रेल्वे कामगार आणि विद्यार्थ्यांना पोहचवत आहेत.
सविस्तर वृत्त : विविध राज्यात अडकलेल्या लोकांना घेऊन पाच रेल्वे रवाना
11:21 May 02
८३९ स्थलांतरीत कामगारांना घेऊन विशेष श्रमिक रेल्वे उत्तर प्रदेशला रवाना..
-
Maharashtra: A 'Sharmik special train' carrying 839 migrant workers departs from Nashik Road railway station for Lucknow in Uttar Pradesh pic.twitter.com/dQAHatHbjU

">Maharashtra: A 'Sharmik special train' carrying 839 migrant workers departs from Nashik Road railway station for Lucknow in Uttar Pradesh pic.twitter.com/dQAHatHbjU
— ANI (@ANI) May 2, 2020Maharashtra: A 'Sharmik special train' carrying 839 migrant workers departs from Nashik Road railway station for Lucknow in Uttar Pradesh pic.twitter.com/dQAHatHbjU
— ANI (@ANI) May 2, 2020
नाशिक - ८३९ स्थलांतरीत कामगारांना घेऊन एक विशेष श्रमिक रेल्वे उत्तर प्रदेशला रवाना झाली आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकातून ही रेल्वे लखनऊला पाठवण्यात आली.
10:58 May 02
'गोवा' झाले कोरोनामुक्त..
पणजी - देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना गोवा राज्याने सर्वांपूढे आदर्श ठेवला आहे. राज्यात ७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. हे सातही रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सरकारने राबवलेल्या प्रवाभी उपाययोजना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अविरत परिश्रमामुळे राज्य कोरोनामुक्त झाले आहे.
सविस्तर वृत्त : गोवा देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य; 'या' उपाययोजनामुळे महामारीवर मात
10:49 May 02
आता 'आरोग्य सेतू' इन्स्टॉल करणे झाले बंधनकारक..
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे मोबाईल आधारीत अॅप विकसित केले आहे. हे अॅप सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्त : आरोग्य सेतू अॅप सरकारी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक
10:42 May 02
हृदयद्रावक! कोरोनामुळे अवघ्या २० दिवसांच्या बाळाचा मृत्यू..
जयपूर - राजस्थानमधील जयपूरच्या जेके लोन रुग्णालयामध्ये कोरोनामुळे एका 20 दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जगातील ही पहिलीच घटना आहे की, कोरोना विषाणूमुळे एवढ्या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त : कोरोनाचा कहर..! जयपूरमध्ये 20 दिवसाच्या बालकाचा मृत्यू
10:28 May 02
१७ मे पर्यंत दिल्लीतील सर्व जिल्हे 'रेड झोन'मध्ये..
नवी दिल्ली - १७ मे पर्यंत दिल्लीतील सर्व (११) जिल्हे हे 'रेड झोन' मध्ये असणार आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार रेड झोनमधील सर्व नियम या जिल्ह्यांना लागू होतील, अशी माहिती सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.
देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच, देशातील जिल्ह्यांची विभागणी वेगवेगळ्या झोनमध्ये करण्यात आली आहे. एखाद्या भागात दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले, तर त्याला 'रेड झोन' घोषित केले जाते.
10:17 May 02
महाराष्ट्रातून झांसीला परतलेले सात कामगार आढळले कोरोना 'पॉझिटिव्ह'..
लखनऊ - महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये परत गेलेल्या सात कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व कामगार बसने झांसीमार्गे बस्ती जिल्ह्यामध्ये गेले होते. जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
10:07 May 02
सीआरपीएफच्या आणखी ६८ जवानांना कोरोनाची लागण; एकूण संख्या पोहोचली १२७वर..
नवी दिल्ली - सीआरपीएफच्या आणखी ६८ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व जवान पूर्व दिल्लीतील एकाच बटालियनमधील आहेत. या बटालियनमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १२२वर पोहोचली आहे. तसेच, आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण जवानांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला आहे, तर एका जवानावरील उपचार यशस्वी झाले आहेत.
09:56 May 02
राजस्थानमध्ये १२ नव्या रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण संख्या पोहोचली २,६७८..
जयपूर - राजस्थानमध्ये कोरोनाच्या १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २,६७८वर पोहोचली आहे. यासोबतच तीन नव्या मृत्यूंची नोंद झाल्यामुळे, राज्यातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ६५ झाली आहे. तर राज्यातील १,११६ रुग्णांवर आतापर्यंत यशस्वी उपचार झाले असून, एकूण ७१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
09:19 May 02
गेल्या २४ तासांमध्ये आढळले २,२९३ रुग्ण; आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक वाढ..
नवी दिल्ली - गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाच्या २,२९३ रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एका दिवसात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ३७,३३६वर पोहोचली आहे.
यामध्ये २६,१६७ रुग्ण अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत ९,९५० रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये झालेल्या ७१ मृत्यूंच्या नोंदीनंतर देशातील एकूण बळींची संख्या १,२१८ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.