हैदराबाद - दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या 6 भाविकांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यात तेलंगणामधून गेलेल्या काही जणांचा समावेश आहे. 13 मार्च ते 15 मार्च दरम्यान हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेलंगणा सरकारने सोमवारी ही माहिती दिली.
-
Six people from Telangana who attended a religious congregation at Markaz in Nizamuddin area of New Delhi from 13-15 March succumbed after they contracted #Coronavirus. Two died in Gandhi Hospital while one each died in Apollo Hospital, Global Hospital, Nizamabad and Gadwal
— Telangana CMO (@TelanganaCMO) March 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Six people from Telangana who attended a religious congregation at Markaz in Nizamuddin area of New Delhi from 13-15 March succumbed after they contracted #Coronavirus. Two died in Gandhi Hospital while one each died in Apollo Hospital, Global Hospital, Nizamabad and Gadwal
— Telangana CMO (@TelanganaCMO) March 30, 2020Six people from Telangana who attended a religious congregation at Markaz in Nizamuddin area of New Delhi from 13-15 March succumbed after they contracted #Coronavirus. Two died in Gandhi Hospital while one each died in Apollo Hospital, Global Hospital, Nizamabad and Gadwal
— Telangana CMO (@TelanganaCMO) March 30, 2020
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 6 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यात तेलंगणा मधून गेलेल्या काही जणांचा समावेश होता.
मृतांपैकी दोघांचा येथील गांधी रुग्णालयात तर, दोघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. इतर दोघांपैकी एकाचा निजामाबाद तर, दुसऱ्याचा गढवाल येथे मृत्यू झाला, असे सरकारकडून आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
'मरकज' आयोजित करणाऱ्या मौलानावर गुन्हा दाखल
निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना विषाणूचा मोठा धोका निर्माण झालेला असताना शेकडो लोकांना एकत्र आणणे, ही अत्यंत बेजबाबदारपणाची कृती होती, असे सरकारने म्हटले आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे शेकडो लोकांचे जीव धोक्यात आले. यामुळे हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मौलानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या काळात दिल्लीमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी लागू होती. यामुळे एका वेळी इतक्या लोकांना एका ठिकाणी एकत्र आणणे, हे सरकारी आदेशाचेही उल्लंघन होते. सध्या या कार्यक्रमातील 175 लोकांना रुग्णालयात दाखल केले आहे. तर, काही जण आयसोलेशमध्ये आहेत.