ETV Bharat / bharat

स्वच्छता कामगारांच्या संरक्षणाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

लॉकडाऊन दरम्यान काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणाची हमी देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

COVID-19: Plea seeking protection of rights of sanitation workers filed in SC

author img

By

Published : Apr 10, 2020, 11:19 AM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी, आत्यवश्यक सेवा पुरवणारे कामगार आणि स्वच्छता कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. लॉकडाऊन दरम्यान काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणाची हमी देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते हरनाम सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. स्वच्छता सफाई कामगारांना 24 तासांच्या कालावधीत संरक्षक उपकरणे उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात यावी. तसेच कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची 48 तासांच्या कालावधीत कोरोना चाचणी घ्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

प्रत्येक शहर, गाव, रस्ते स्वच्छ करणे, प्रत्येक घरातील कचरा वाहून नेणे, इत्यादी आवश्यक सेवा स्वच्छता कर्मचारी करतात. हे काम करताना संसर्गजन्य कोरोनाविषाणूपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे वैयक्तिक संरक्षक उपकरणे नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जारी केलेल्या पत्रकानुसार स्वच्छता कामगारांनी फेस शील्ड, मास्क आणि इतर वैयक्तिक संरक्षक उपकरणाच वापर करणे गरजेचे आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.