ETV Bharat / bharat

कोरोना रुग्णाला ऑक्सिजन ठरतयं संजीवनी बुटी...

author img

By

Published : Jul 3, 2020, 3:39 PM IST

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यास अनेकदा रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. अशा वेळी त्याला बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ येते, अन्यथा रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर ऑक्सिजनचा पुरवठा असलेल्या खाटांची गरज वाढली आहे.

ऑक्सिजन
ऑक्सिजन

जगभरात प्रचंड वेगाने कोरोनाचा संसर्ग पसरत असून हा विषाणू हजारो लोकांचे बळी घेत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशास्थितीत रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन हे संजीवनी बुटीच ठरत आहेत. ऑक्सिजन रूग्णांवर कसे काम करते आणि ऑक्सिजनची वाढती मागणी असलेल्या रूग्णांसाठी भारतात काय परिस्थिती आहे, हे जाणून घेणे फायदेशीर ठरेल. सध्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजन सिलिंडर मिळेल की नाही, अशी भीती अनेक रुग्णालयांना वाटत आहे.

रुग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटर महत्त्वाचे आहे. मात्र, त्याचा तुडवडा असल्याने रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून बरीच रुग्णालये ही रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एकूण कोरोना रुग्णांपैकी 15 टक्के रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची गरज लागेल. गंभीर प्रकृती असलेल्या 5 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर आवश्यकता असेल. तर उर्वरीत रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर समर्थन लागणार नाही.

आरोग्य मंत्रालयाच्या सरासरी मूल्यांकनानुसार, ऑक्सीजनयुक्त बेडला दररोज 90 जंम्बो सिंलेडरची गरज भासू शकते. तर आणखी 90 सिलेंडर हे पर्याय म्हणून लागतील. प्रत्येक सिलेंडरमध्ये 7.25 क्यूबिक मीटर ऑक्सिजन असतो.

रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी प्रमुख स्त्रोतांचा समावेश करुन मंत्रालयाने मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत. ऑक्सिजन, ऑक्सिजन सिस्टम घटक, गरजेनुसार ऑक्सिजनच्या प्रमाणात खबरदारी, ऑक्सिजन सिलेंडर हाताळताना सावधगिरी, सिलिंडर निर्जंतुकीकरण, लोडिंग, अनलोडिंग, वापर, देवाणघेवाण, याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच ऑक्सिजन पुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून वेळेवर आवश्यक देयके सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित रुग्णालये व कर्मचार्‍यांना सुचित केले पाहिजे.

ऑक्सिजन बेड म्हणजे काय?

ऑक्सिजन बेड’ ला तीन गोष्टीची आवश्यकता असते. ऑक्सिजन पुरवठा पाईप, एक ऑक्सिजन कॉन्सॅन्ट्रेटॅर किंवा ऑक्सिजन सिलेंडर. या गोष्टी सुरवातीपासून सेट केल्या आहेत की नाही, यावर अवलंबून आहे. बेडला पाइपलाइन वाढविल्यास, बेडची किंमत हजार ते लाखपर्यंत असते.

ऑक्सिजन केंद्राची क्षमता आणि अत्याधुनिकतेनुसार अंदाजे १ ते 3 लाख रुपये खर्च होऊ शकतो. तर एका सिलिंडरची किंमत अंदाजे 7 ते 8 हजार रुपये असते. पण मागणी वाढत असताना विशेषतः दुर्गम भागात पुरवठ्याची अडचण निर्माण होते.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते 1 मेपासून, देशात दाखल करण्यात आलेले कोरोना रुग्णांपैकी जवळजवळ 3.2 टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. तर 1.1 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले. तसेच 4.7 टक्के आयसीयूत होते.

भारताकडे 75 हजार च्या मागणीच्या तुलनेत देशात 19 हजार 398 व्हेंटिलेटर उपलब्ध होते. भारताने 60 हजार 884 व्हेंटिलेटर ऑर्डर दिले होते. 28 जून 2020 च्या आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन दिले होते. त्यानुसार देशात 1 हजार 55 सर्व पायाभूत सुविधा रुग्णालये उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये 1,77,529 आयसोलेशन बेड, 23,168 आयसीयू बेड आणि 78,060 ऑक्सिजन सपोर्ट बेड, तर 2,400 कोरोना हेल्थ सेंटरमध्ये 1,40,099 आयसोलेशन बेड्स, 11,508 आयसीयू बेड आणि 51,371 ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत.

जीवन जगण्यासाठी बहुतांश वस्तुमध्ये ऑक्सिजन हे महत्त्वाचा घटक म्हणून वापरला जातो. याची सर्व सजीवां श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यास अनेकदा रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. अशा वेळी त्याला बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ येते, अन्यथा रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर ऑक्सिजनचा पुरवठा असलेल्या खाटांची गरज वाढली आहे.

वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा बर्‍याच प्रकारे केला जातो. भारतातील वैद्यकीय संस्था किंवा रुग्णालये विशेषत: लहान शहरातील ही ऑक्सीजन सिलेंडरवर अवलंबून असतात. हे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात आणि ऑक्सिजन-बँकेत संग्रहीत केले जातात.

एआयआयजीएमएच्या मते, भारतात केवळ 15 ते 20 टक्के ऑक्सिजन वैद्यकीयसाठी तयार केले जाते. उर्वरीत अन्य क्षेत्र आणि स्टीलच्या औद्योगिक उत्पादनासाठी आहे. सरकारी सर्वेक्षणाद्वारे रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्याशी संबंधित बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. बिहार आणि नागालँडमध्ये ऑक्सिजन सिलिंडर्स आणि ऑक्सिजन नियामकांची कमतरता लक्षात आली.

तेलंगणा सरकार बेड्सला थेट ऑक्सिजन पुरवठा करणारे वॉर्ड स्थापन करण्याचे ठरवत आहे. उस्मानिया रुग्णालय, गांधी रुग्णालय आणि तेलंगणा इन्स्टिट्यूट ऑफ कोरोना व्हायरास वॉर्ड, वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन येथील बेड्सला थेट पुरवठा करणारे वार्ड तयार करण्यासाठी निविदा काढल्या गेल्या आहेत

7 एप्रिलला भारत औषध नियंत्रकांनी औद्योगिक ऑक्सिजन उत्पादकांना परिपत्रक जारी केले. कोरोना रुग्णांवर वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन तयार करण्याची परवानगी देण्यात आली. ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायदा 1940 नुसार अर्ज केल्यास ऑक्सिजन तयार करण्याची परवानगी 24 तासाच्या आत देण्यात येईल, असे नमूद केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.