ETV Bharat / bharat

कोरोनाचा प्रसार डास चावल्याने होत नाही, कॅन्सास विद्यापीठाचे संशोधन

author img

By

Published : Jul 18, 2020, 7:24 PM IST

विद्यापीठाचे उपाध्यक्ष स्टिफन हिग्स यांनी बायोसिक्युरिटी इन्स्टिट्युटच्या संशोधकांशी मिळून हा अभ्यास केला आहे. 17 जुलैला 'नॅचरल साईन्टिफिक रिपोर्ट' मध्ये त्यांनी अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद - कोरोना आणि सार्स विषाणूचा प्रसार मच्छर चावल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होत नाही, असे कॅन्सास विद्यापीठाच्या संशोधनात पुढे आले आहे. ‘नॅचरल सायन्टिफिक रिपोर्ट’मध्ये संशोधकांनी अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मच्छारांपासून कोरोना पसरत नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र, आमच्या अभ्यासामुळे माहितीच्या आधारे यास पुष्ठी मिळाल्याचे संशोधकांनी सांगितले.

विद्यापीठाचे उपाध्यक्ष स्टिफन हिग्स यांनी बायोसिक्युरिटी इन्स्टिट्युटच्या संशोधकांशी मिळून हा अभ्यास केला आहे. 17 जुलैला 'नॅचरल साईन्टिफिक रिपोर्ट' मध्ये त्यांनी संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले. मच्छराच्या दंशामुळे कोरोनाचा प्रसार होत की नाही? या बाबतचा हा पहिलाचा अभ्यास असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

संशोधकांनी एडिस इजिप्ती, एडीस अ‌ॅलबोपिक्टस आणि क्युलेक्स क्विनक्यूफॅस्कॅटस या तीन मच्छरांच्या प्रजातींवर संशोधन केले. कोरोना विषाणूसंबंधी आणखी माहिती मिळावी म्हणून हे संशोधन करण्यात आले. कॅन्सास विद्यापीठाने आत्तापर्यंत कोरोनावर चार संशोधने केली आहेत. कोरोना आणि सार्ससंबंधीचा हा अहवाल पहिल्यांदाच प्रकाशित केल्याचे संशोधकांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.