ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर... - देशभरातील कोरोना अपडेट

आज महाराष्ट्र राज्यात २ हजार ९४९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या एकूण ७२ हजार ३८३ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे.

COVID-19 news from across the nation
देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर...
author img

By

Published : Dec 15, 2020, 2:17 AM IST

हैदराबाद - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून टेलिमेडिसिन ई-संजीवनी उपक्रम राबवला जात आहे. हा उपक्रम १ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचला आहे. भारतातील ५५० हून अधिक जिल्ह्यामधील रुग्णांनी ई-संजीवनी उपक्रमाचा उपयोग केला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनाव्दारे दिली आहे. यात त्यांनी १० टक्याहून अधिक युजर हे ६० किंवा त्याहून अधिक वयाचे असल्याचे म्हटलं आहे. जवळपास एक चतुर्थांश रूग्णांनी एकापेक्षा जास्त वेळा ई-संजीवनी वापरली असल्याचे सांगितलं आहे.

COVID-19 news from across the nation
देशातील कोरोना स्थिती...

प्रत्येक सत्रात 100-200 लोकांना लसीकरण करणे, त्यांचे निरिक्षण करणे, ही बाब कोविड-१९ लस अभियानासाठी केंद्र सरकराने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनापैकी एक आहे. राज्यांना नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोविड लस इंटेलिजेंस नेटवर्क (को-डब्ल्यूआयएन) सिस्टम हे वास्तविक लहरीकरण आणि एंन्टी-कोरोना व्हायरस लसींसाठी नोंदणीकृत लाभार्थींचा मागोवा घेण्यासाठी वापरलं जाणार आहे. लसीकरण ठिकाणी केवळ पूर्व नोंदणीकृत लाभार्थींना प्राधान्यक्रमानुसार लस दिली जाईल आणि ऑन द स्पॉट नोंदणीसाठी कोणतीही तरतूद यात राहणार नाही. याशिवाय राज्यांना एका उत्पादकाकडून प्रत्येक जिल्ह्यात लस वाटप करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लस कमी तापमानात ठेवण्यासंबधीचे उपायही सुचवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र

आज राज्यात २ हजार ९४९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाक ८३ हजार ३६५ वर पोहोचला आहे. राज्यात आज ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४८ हजार २६९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या एकूण ७२ हजार ३८३ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिल्ली

'आप'च्या सरकारने दिल्लीतील ज्या जिल्ह्यात संक्रमणाची संख्या जास्त आहे, अशा जिल्ह्यांमध्ये कोविड-१९ च्या चाचण्यांची वाढ करण्याची अपेक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. रविवारी शहरात कोरोनामुळे ३३ जणांचा मृत्यू झाला. यासह हा आकडा आता दहा हजाराच्या घरात पोहोचला आहे. दिल्लीत कोरोनाने मृत्यू झालेली पहिली व्यक्ती जनकपुरी येथील ६९ वर्षांची महिला होती. तिला आंतरराष्ट्रीय प्रवासातून परत आलेल्या तिच्या मुलाकडून हा आजार झाला होता. दरम्यान, दिल्लीत कोरोना संसर्गाची वाढ होण्याचे प्रमाण गेल्या महिन्यापासून खूपच कमी झाले आहे. असे असले तरी शहरातील मृत्यूचे प्रमाण अद्याप चिंतेचा विषय आहे.

तमिळनाडू

मद्रासमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील १०० हून अधिक विद्यार्थांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर तामिळनाडूचे आरोग्य सचिव जे राधाकृष्णन यांनी सांगितलं की, एकूण १०४ विद्यार्थी आणि इतर काही जण कोरोनामुक्त झाले आहेत.

बिहार

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदूस्थानी अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याची माहिती ट्विट करून दिली. यात त्यांनी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

केरळ

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी, राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. लसीसाठी कोणतेही दर आकारणार नाही, असे विजयन यांनी स्पष्ट केले आहे. ते कन्नूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.