ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - भारत कोरोना लाईव्ह बातमी

देशात आत्तापर्यंत ८३ लाख १३ हजार ८७७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील १ लाख २३ हजार ६११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७६ लाख ५६ हजार ४७८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी ६. ४२ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात सर्वात जास्त रुग्णांची संख्या नोंदवली गेली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Nov 5, 2020, 3:07 AM IST

हैदराबाद - भारतातील अंतर्गत नागरी विमान वाहतूक सेवा पुढील वर्षी २४ फेब्रुवारीपर्यंत एकूण क्षमतेच्या ६० टक्केच सुरू राहणार आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता नागरी उड्डान विभागाने हा निर्णय घेतला आहे. २ ऑक्टोबरला अधिकृत आदेश काढत मंत्रालयाने विमान कंपन्यांना या निर्णयाची माहिती दिली होती. मात्र, कधीपर्यंत हा निर्णय लागू राहणार हे सांगितले नव्हते. ते आता स्पष्ट केले आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ७६ टक्के रुग्ण हे दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. दिल्ली आणि केरळ राज्यात दरदिवशी ६ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण दरदिवशी आढळत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीतून समोर आले आहे.

दिल्ली -

मागील काही दिवसांत दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून ही संसर्गाची तीसरी लाट असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी सांगितले. नागरिकांनी घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. सरकार परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे, असेही ते म्हणाले. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील बाजार फुलून गेले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे.

महाराष्ट्र -

राज्यात बुधवारी ५ हजार ५०५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज ८ हजार ७२८ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ४० हजार ५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६८ टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यंत एकूण ४४ हजार ५४८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९१ लाख ८५ हजार ८३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ९८ हजार १९८ (१८.४९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३ लाख ३५ हजार ६८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ११ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख १२ हजार ९१२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोनाच्या प्रसारामुळे मार्चपासून बंद असलेली कंटेनमेंट झोनबाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत आजपासून (गुरुवार) सुरू होणार आहेत. त्याचबरोबर, जलतरण तलाव आणि इनडोअर गेमसाठीही नियमांचे पालन करत सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

कर्नाटक -

सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत कर्नाटक राज्यातील सुमारे २७.३ टक्के लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे अहवालातून समोर आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सिरो सर्व्हे केला आहे. यानुसार एकूण १५ हजार ६२४ नमुन्यांपैकी १६.४ टक्के नागरिकांमध्ये अ‌ॅन्टिबॉडीज(प्रतिजैविक) तयार झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

तामिळनाडू -

तामिळनाडू राज्यातील व्हायरल रिसर्च अ‌ॅन्ड डायगॉन्स्टिक लॅबोरेटरी (VRDL) या सरकारी महाविद्यालय आणि रुग्णालयाने आत्तापर्यंत २ लाख नागरिकांच्या आरटी- पीसीआर चाचण्या घेतल्या आहेत. ही प्रयोगशाळा राज्यातील सर्वात जुन्या प्रयोगशांपैकी एक असून तिला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून परवानगी मिळाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.