हैदराबाद - सलग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 60 हजारपेक्षा कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर सध्या देशातील कोरोना मृत्यूदर 1.51 टक्के इतका आहे, अशी माहिती बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचे लक्ष ठेवावे, असा सल्ला दिला आहे.
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 76 लाख 51 हजार 107 इतकी झाली आहे. त्यात 1 लाख 15 हजार 914 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. तर तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा सातत्याने वाढत आहे. तो सध्या 88.8 टक्के इतका आहे.
- दिल्ली
नवी दिल्ली - कोरोनाच्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने क्लब, हॉटेल्स, मद्यविक्रीची दुकाने आणि रेस्टॉरंट्स यांना स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टिमनुसार (एसओपी) काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याची आदेश दिले आहे.
सहाय्यक आयुक्त (अंमलबजावणी) यांना हॉटेल्स, क्लब आणि रेस्टॉरंट्समधील बारमध्ये एसओपीची पूर्तता तपासण्यासाठी टीम तैनात करण्यास सांगितले आहे..
दिल्ली विमानतळ ऑपरेटर डायलने बुधवारी म्हटले, कोरोनाशी संबंधित आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागतिक स्तरावर दुसरे सर्वात सुरक्षित एरोड्रोम असल्याचे प्रमाणपत्र दिले गेले आहे. सेफ ट्रॅव्हल बॅरोमीटरने पुढाकार घेत सेफ ट्रॅव्हल स्कोअर बनवले आहे. यात कोरोना कोळात आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीबद्दल 200 पेक्षा जास्त विमानतळांचे मूल्यांकन केले गेले.
- महाराष्ट्र
मुंबई - मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किंमतीत नागरिकांना उपलब्ध व्हावे, यासाठी पुढाकार घेणारे महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार आहे. याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार जनतेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे सक्तीचे आहे. विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा ही साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहणार आहे.
- कर्नाटक
बंगळुरू - कोरोनामुळे प्रदीर्घकाळाच्या घसरणानंतर पुनर्प्राप्तीसाठी पुढाकार घेणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूकीत बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो वोल्यूममध्ये सप्टेंबरमध्ये चांगली वाढ झाली. तर पुदुच्चेरीमधील ठिकाणांसाठी आंतरराज्यीय बस सेवा 23 ऑक्टोबरपासून (शुक्रवार) पुन्हा सुरू होईल, असे कर्नाटक राज्य रस्ता परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) बुधवारी जाहीर केले.
- राजस्थान
जयपूर - राज्यात बुधवारी आणखी 14 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. याबरोबरच राज्यातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या 1 हजार 778 इतकी झाली आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. तर राज्यात 1 हजार 810 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. याबरोबरच राज्यातील एकूण मृतांची संख्या 1 लाख 78 हजार 933 इतकी झाली आहे. यापैकी 19 हजार 185 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अहवालानुसार, आतापर्यत 1 लाख 57 हजार 960 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
- पश्चिम बंगाल
कोलकाता - मागील 10 दिवसांत 3 हजार लोकांना कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे तसेच मास्क न वापरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
याव्यतिरिक्त, शहरातील आणि आसपासच्या भागातून कोलकाता पोलिसांनी, 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान, 3 हजार 418 लोकांना अटक केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न घातल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.
- ओडिशा
कटक - राज्य सरकारने लादलेल्या दुर्गा पूजा मंडपातील मूर्तींच्या उंचीवरील निर्बंध रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी ओडिशा उच्च न्यायालयाने रिट याचिकांवर सुनावणी केली. यानंतर उच्च न्यायालयाने कटक शहरातील 9 पूजा समित्यांना 4 फूट उंचीवर देवी दुर्गाच्या मूर्ती तयार करण्यास व त्यांची पूजा करण्यास परवानगी दिली.