हैदराबाद - देशात कोरोनाबाधितांचा आकडा ७४ लाखांहून अधिक झाला. तर ६५ लाखांहून अधिक जणांनी कोरोनाने मात केली आहे. कोरोनातून बरे होण्याचा दर ८७.७८ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
कोरोनाने शनिवारी देशात ८३७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनातील मृत्यूचा आकडा हा एकूण १ लाख १२ हजार ९९८ वर पोहोचला आहे. शनिवारी ६२ हजार २१२ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण ७४ लाख ३२ हजार ६८० झाल्याचे शनिवारी मिळालेल्या आकडेवारीतून दिसून आले आहे. सलग नवव्या दिवशी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या नऊ लाखांहून कमी झाली आहे. मृतामधील ८३७ पैकी ३०६ जण महाराष्ट्रातील आहेत. तर मृतामधील ७३ जण हे कर्नाटक, ६१ जण पश्चिम बंगाल, ५७ जण तामिळनाडू, उत्तर प्रदेशमधील ४६ तर छत्तीसगडमधील ४० जणांचा समावेश आहे.
नवी दिल्ली-
कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिल्लीमध्ये वाढली आहे. दिल्लीत १५ ऑक्टोबरपर्यंत ३ लाख २१ हजार ३१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे नवी दिल्लीने कोरोनाच्या संख्येत पुण्याला मागे टाकले आहे. शनिवारी दिल्लीत कोरोनाचे नवे ३, ४८३ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात १,३०१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आसाम
आसाम सरकारने शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याची शनिवारी घोषणा केली आहे. सहावी इयत्तेच्या पुढील वर्गाच्या शाळा २ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
महाराष्ट्र
मुंबई विमानतळावर कोरोनाच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी सुविधा सुरू करण्यात आली आहे. आरटी-पीसीआर ही सुविधा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.
कर्नाटक
कर्नाटकमध्ये नवीन ७, ५४२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७,५१,३९० झाली. तर मृतांचा आकडा १०,३५६ आहे. तर शनिवारी कोरोनावर मात केलेल्या ८,५८० रुग्णांना रुग्णालयातून घरी सुट्टी देण्यात आली आहे.
आंध्रप्रदेश-
आंध्रप्रदेशमध्ये ५,५२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३,६७६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी सकाळी नऊपर्यंत २४ तासात कोरोनाने २४ जणांचा मृत्यू झाला.
केरळ-
केरळमध्ये शनिवारी नवीन ९, १६ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,३२,२२८ झाली आहे. तर शनिवारी २६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १,१३९ जणांचा मृत्यू झाला आहे.