ETV Bharat / bharat

भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोरोनावर लस निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. २०२१च्या जानेवारीपर्यंत ही लस सर्वांसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन पवारांनी लसीसंदर्भात सविस्तर चौकशी केली.

author img

By

Published : Oct 3, 2020, 1:38 AM IST

भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

हैदराबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सेरोलॉजिकल सर्व्हे करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा तिसरा टप्पा नुकताच करण्यात आला. यातून बरीच वेगळी माहिती समोर आली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज जवळपास ४ टक्के लोकांमध्ये निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती यातून समोर आली आहे.

तेलंगणा -

राज्यात कालप्रमाणेच आजही कोरोना रुग्णांपेक्षा अधिक संख्या रुग्ण बरे होणाऱ्यांची आहे. राज्यात २ हजार ९ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत. यानंतर एकूण बाधितांची संख्या १ लाख ९५ हजार ६०९ झाली असून १ लाख ६५ हजार ८४४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८४.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दिल्ली -

राजधानीत कोरोनामुळे ३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून २ हजार ९२० नव्या कोरोना रुग्णांमुळे दिल्लीतील एकूण बाधितांची संख्या २.८५ लाखांवर गेली आहे. १६ जुलै रोजी शहरात सर्वाधिक ५८ जणांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत ५ हजार ४३८ रुग्णांना बळी गेला आहे.

महाराष्ट्र -

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोरोनावर लस निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. २०२१च्या जानेवारीपर्यंत ही लस सर्वांसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन पवारांनी लसीसंदर्भात सविस्तर चौकशी केली. ऑगस्ट महिन्यापासून सिरमला भेट देण्याची ही पवारांची दुसरी वेळ आहे. दरम्यान, राज्यात १५ हजार ५९१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या 14 लाख 16 हजार 513 वर पोहोचली आहे.

पश्चिम बंगाल -

राज्यातील भाजपचे नेते अनुपम हजरा यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी आपल्या एका वक्तव्याने हजरा चर्चेत राहिले होते. 'मला जर कोरोना संसर्ग झाला तर मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आलिंगन देईल', असे हजरा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. आपल्या फेसबुक पेजवर 'कोव्हिड पॉझिटिव्ह' असे लिहून हजरा यांनी याबाबत माहिती दिली.

तामिळनाडू -

डीएमडीके अध्यक्ष ए. विजयकांत आणि त्यांच्या पत्नीला रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती एमआयओटी रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी दाम्पत्य रुग्णालयात दाखल झाले होते.

ओडिशा -

गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ६०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधित रुग्णांची संख्या २ लाख २६ हजार ३३४ वर पोहोचली आहे. पैकी सध्या ३५ हजार ३२६ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राजस्थान -

देशभरात अनलॉक-५ लागू झाले आहे. याअंतर्गत वर्ग ९ ते १२ च्या मुला-मुलींना परवानगीसह शाळेत जाता येणार आहे, अशी माहिती राजस्थान गृह विभागाने दिली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत राजस्थानात जलतरण तलाव, चित्रपटगृहे यावर बंदी असणार आहे. राजस्थानात २० हजार ८०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.