ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - भारत कोरोना रुग्णसंख्या

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दररोज कमालीची वाढ होत असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे. गुरुवारी देशभरात एकूण 97,894 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आत्तापर्यंत देशात एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Sep 18, 2020, 3:11 AM IST

नवी दिल्ली - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रंचड वेगाने वाढत आहे. गुरुवारी देशभरात एकूण 97,894 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आत्तापर्यंत देशात एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. या वाढीबरोबर एकूण बाधितांचा आकडा 51,18,253 वर पोहचला आहे. 1,132 रुग्णांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 83,198 एवढी झाली आहे. दरम्यान, गुरुवारी कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र, सध्या देशात १० लाखाहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामृत्यू दर सध्या 1.63 टक्के नोंदवण्यात आला आहे.

कोरोनाबाबतच्या फावीपिरावीर २०० एमजी गोळीची चौथ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी घेण्याच्या डॉ. रेड्डी यांच्या प्रस्तावाला 'ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'कडून मान्यता दिली आहे. चाचण्यांच्या अभ्यासासाठी औषध कंपनीला ५० टक्के सरकारी जागेचा वापर करण्यास सांगितले आहे.

कोरोना आकडेवारी
कोरोना आकडेवारी

दिल्ली -

राजधानीत गुरुवारी कोरोनाचे नवे 4,432 रुग्ण आढळून आले असून 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 2,34,701 झाली असून आत्तापर्यंत 4,877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याशी संपर्कात आलेल्यांनी दक्ष राहून कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना संध्याकाळी ५ वाजता 'एम्स' रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. चार दिवसांपूर्वी ते संपूर्ण वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. कोरोनाची लागण झाल्यापासून ते तीनवेळा रुग्णालयात दाखल झाले होते.

उत्तर प्रदेश -

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,771 झाला आहे. आज 81 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून 6,318 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,36,294 इतकी झाली आहे. सध्या 68,235 अ‌ॅक्टीव रुग्ण असून 2,63,288 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

अरुणाचल प्रदेश -

अरुणाचल प्रदेशमध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक 221 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 6,692 वर जावून पोहचला आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी गुरुवारी आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले. 15 सप्टेंबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

कर्नाटक -

कर्नाटकात 9,366 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 93 रुग्णांचा कोरोनामुळे गुरुवारी मृत्यू झाला. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 4,94,356 इतका झाला असून 7,629 लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. आज 7,268 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने रुग्णालयातून त्यांना सोडण्यात आले. 3,83,077 रुग्ण आत्तापर्यंत कोरोनातू बरे झाले आहेत.

कर्नाटकचे नवनियुक्त राज्यसभा खासदार अशोक गस्ती यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

तामिळनाडू -

तामिळनाडूमध्ये गुरुवारी 5,560 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. या वाढीसह राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 5,25,420 इतका झाला. आज सर्वाधिक 59 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 8,618 वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत 4,70,192 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

हेही वाचा - राज्यात कोरोनाचा उद्रेक; २४ हजार ६१९ नव्या रुग्णांची नोंद, ३९८ मृत्यू

हेही वाचा - मुंबईत कोरोनाच्या नव्या 2389 रुग्णांची नोंद; 43 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.