ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा...वाचा सविस्तर - भारत कोरोना

महाराष्ट्रातील करोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी २३ हजार ८१६ रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत १३ हजार ९०६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून, ३२५ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ८९ हजार ७०६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरातील एकूण रुग्णसंख्या ४३ लाख ७० हजार १२८ वर पोहोचली. भारतात मृत्यूचा आकडाही ७३ हजार ८९० वर गेला असून, गेल्या २४ तासांत १,११५ मृत्यूंची नोंद झाली.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Sep 11, 2020, 2:28 AM IST

हैदराबाद - दुष्परिणामांच्या संशयामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी तूर्त जगभरात थांबविण्यात येत असल्याचे अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने बुधवारी जाहीर केले. त्यानंतर भारतात 'कोव्हीशिल्ड' नावाने ही लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटने याबाबत माहिती न दिल्याने औषध महानियंत्रकांनी ‘सीरम’ला नोटीस बजावली.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या या लसीच्या उत्पादनाबाबत सीरम इन्स्टिटय़ूटची अ‍ॅस्ट्राझेन्काशी (ब्रिटिश-स्वीडीश कंपनी) भागीदारी आहे. मानवी चाचणीत सहभागी झालेल्या एका व्यक्तीवर लसीचा दुष्परिणाम झाल्याचे आढळल्यानंतर अ‍ॅस्ट्राझेन्काने लसीच्या चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला. या लसीमुळे काय दुष्परिणाम झाले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, लसीची सुरक्षितता पडताळण्यासाठी तूर्त चाचण्या थांबविण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले. मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्यात येत असताना एखाद्या व्यक्तीवर दुष्परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्याची स्वतंत्र समितीद्वारे तपासणी करून सुरक्षेबाबतची खातरजमा करून घेण्यासाठी चाचण्या थांबविण्यात आल्या आहेत. चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्यांची सुरक्षा आणि लसीच्या उच्च दर्जाबाबत कटिबद्ध असल्याचे अ‍ॅस्ट्राझेन्काच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

CORONA
देशातील कोरोना आकडेवारी

तमिळनाडू - एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) देशभरात सुरक्षित आणि कोविड मुक्त वातावरणासाठी प्रयत्न करीत आहे. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाने पुन्हा सुरक्षित काम सुरू केले आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉकमुळे विमानतळावरून विमानांचे उड्डाण वाढले आहे. मात्र, विमानतळ प्राधिकरण संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. यासाठी टचलेस पॉईंट्स, हात धुण्याच्या जास्त जागा, निर्जंतुकीकरणाची सक्षम प्रणाली आणि इतर अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

पंजाब - राज्यात गुरुवारी ३८ फेसबुक, ४९ ट्वीटर आणि २१ यु-ट्यूब खात्यांवर पंजाब पोलिसांनी कारवाई केली. कोरोना लसीची संदर्भात चुकीची माहिती प्रकाशीत करण्याचा ठपका या खात्यांवर ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात १५१ फेसबुक, १०० ट्वीटर ४ इंस्ट्राग्राम आणि ३७ यु-ट्यूब खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात १२१ एफआयआर देखील दाखल करण्यात आल्या आहेत.

उत्तराखंड - खानापूरचे भाजपा आमदार कुंवर प्रणवसिंह चॅम्पीयन यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यांच्यावर देहराडूनच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना बाधित कार्यकर्त्याच्या संपर्कात आल्याने कुंवर सिंहांनी स्वत:ला विलगीकरण करुन घेतले होते. मात्र, त्यांचाही कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याने राज्यातील बाधित आमदारांची संख्या ४ झाली आहे. त्यांच्या आधी आमदार कलाधुंगी बंसीधर भगत, मदन कौशिक आणि विनोद चंमोली यांचा अहवाल पॉझीटीव्ह आलेला आहे.

झारखंड - राज्यातील कोरोना बाधित खेळाडूंच्या विलगीकरणासाठी शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. अनलॉक ४मध्ये देण्यात आलेल्या शिथीलतांमुळे राज्यात लवकरच क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जेएससीए मैदानावर १५ सप्टेंबरपासून या क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यात गुरुवारी १ हजार ६०१ कोरोना रुग्णांच्या नोंदीनंतर एकूण बाधितांचा आकडा ५६ हजार ८९७ वर पोहचला आहे.

हिमाचल प्रदेश - पाच महिन्यांच्या बंदीनंतर गुरुवारी राज्यातील मंदिरे उघडण्यात आली. मात्र, कोरोनाच्या भितीमुळे मंदिरात भाविकांची संख्या कमी होती. उना येथील चिंतपुर्णी मंदिरात ५०० तर बिलासपूर येथील नैना देवी मंदिरात दररोज १०० भाविकांनी दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

ओडीशा - राज्यात गुरुवारी आतापर्यंतचे सर्वाधीक ३ हजार ९९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १ लाख ३९ हजार १२१ वर पोहचला आहे. यासोबतच राज्यात मागील २४ तासात ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या ५९१ वर पोहचली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.