ETV Bharat / bharat

देशात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक, 24 तासात 52 हजार 123 नवे रुग्ण - corona news from across the nation

भारतात आजवर 1 कोटी 82 लाखाहून अधिक कोरोना चाचण्या पार पडल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यासह, देशात आजच्या घडीला 1321 कोरोना चाचणी केंंद्र असून त्यापैकी 907 लॅब या सरकारी असून 414 लॅब या खासगी आहेत. तसेत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा जरी 15 लाखांच्या पार गेला असला, तरी त्यापैकी 10 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले असल्याचेही आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आले.

corona updates india
भारत कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 31, 2020, 5:53 AM IST

हैदराबाद - देशात पहिल्यांदाच 24 तासांमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू देखील झाले आहेत. मागील 24 तासांमध्ये देशात 52 हजार 123 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा आता 16 लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे. तर, देशातील एकूण रुग्णसंख्या ही 15 लाख 83 हजार 792 इतकी झाली आहे. मागील 24 तासात कोरोनामुळे 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतात आजवर 1 कोटी 82 लाखाहून अधिक कोरोना चाचण्या पार पडल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यासह, देशात आजच्या घडीला 1321 कोरोना चाचणी केंंद्र असून त्यापैकी 907 लॅब या सरकारी असून 414 लॅब या खासगी आहेत. तसेत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा जरी 15 लाखांच्या पार गेला असला, तरी त्यापैकी 10 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले असल्याचेही आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आले.

COVID-19 news from across the nation
देशात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक, 24 तासात 52 हजार 123 नवे रुग्ण

पाहूयात राज्यनिहाय कोरोनाचा आढावा...

महाराष्ट्र

  • नवी मुंबई - राज्यात गुरुवारी दिवसभरात 11 हजार 147 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची ही सर्वाधिक एकदिवसीय रुग्णवाढ आहे. यासोबत एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 4 लाख 11 हजार 798 इतकी झाली आहे. यापैकी 2 लाख 48 हजार 615५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर सध्या 1 लाख 48 हजार 150 अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. राज्यात गुरुवारी 266 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.58 टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात ११,१४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; आतापर्यंतची एका दिवसातील सर्वोच्च संख्या

दिल्ली

  • नवी दिल्ली - शहरात गुरुवारी 1 हजार 93 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिल्लीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख 43 हजारांवर पोहोचली आहे. तसेच, आतापर्यंत 3 हजार 936 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दिल्लीतील उच्च न्यायालयाचे कामकाज 14 ऑगस्टपर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

तामिळनाडू

  • चेन्नई - राज्यात गुरुवारी कोरोनाच्या 5 हजार 864 नव्या रुग्णांची आणि 97 बळींची नोंद झाली.त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 39 हजार 978 वर पोहोचली आहे. तसेच, एकूण बळींची संख्या 3 हजार 838 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 78 हजार 178 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 57 हजार 962 रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत.

आंध्र प्रदेश

  • अमरावती - गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी आंध्रप्रदेशमध्ये दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 557 वर पोहोचली आहे.

कर्नाटक

  • बंगळुरू - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, गुरुवारी कर्नाटकात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी नोंद झालेल्या 6 हजार 128 रुग्णांनंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 18 हजार 632 वर पोहोचली आहे. तसेच गुरुवारी झालेल्या 83 मृत्यूंच्या नोंदीनंतर राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 2 हजार 230 वर पोहोचली आहे. तसेच, गुरुवारी कर्नाटकात एकूण 3 हजार 793 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

पश्चिम बंगाल

  • कोलकाता - राज्यात गुरुवारी एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी नोंद झालेल्या 2 हजार 434 रुग्णांनंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 67 हजार 692 वर पोहोचली आहे. तसेच गुरुवारी झालेल्या 46 मृत्यूंच्या नोंदीनंतर राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 हजरा 536 वर पोहोचली आहे.

राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, कोलकात्यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, नागपूर आणि अहमदाबादहून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

बिहार

  • पाटणा - राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, बिहारमधील लॉकडाऊनचा कालावधी आणि निर्बंध वाढवण्यात आले आहेत. 1 ते 16 ऑगस्टपर्यंत हे नियम लागू राहतील. राज्यात गुरुवारपर्यंत 48 हजार 1 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.