ETV Bharat / bharat

देशात कोरोनाचा हाहाकार.! २४ तासात ४५ हजार ७२० नवीन रुग्ण - corona cases in india

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत कोरोनाचे ४५ हजार ७२० रुग्ण आढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. ३० ते ४० हजारांमध्ये वाढणारी रुग्णसंख्याने आता ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

COVID-19 news from across the nation
देशात 24 तासात 45 हजार 720 नवीन कोरोना रुग्ण
author img

By

Published : Jul 24, 2020, 5:55 AM IST

हैदराबाद - देशात कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असले, तरी दररोज वाढणारी केरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ इतकी झाली आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार ६०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर चार लाख २६ हजार १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात दररोज मोठ्या प्रमाणात नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तरीही, भारतात कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर हा इतर देशांपेक्षा जास्त, आणि मृत्यूदर हा इतरांपेक्षा कमी असणे, ही दिलासादायक बाब आहे. देशात लॉकडाऊन लागू होऊन आज १२१ दिवस झाले आहेत.

COVID-19 news from across the nation
देशात 24 तासात 45 हजार 720 नवीन रुग्ण...

पाहूयात कोरोनासंबंधी राज्यनिहाय ठळक घडामोडी..

महाराष्ट्र

  • मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या वर गेली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नका, काळजी घ्या, सुरक्षित राहा हे आवाहन सरकार, महापालिका प्रशासन यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात आज (गुरुवार) ९ हजार ८९५ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये २९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर आता ३.७ टक्के इतका झाला आहे. तर महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ६ हजार ४६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १ लाख ९४ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात गुरुवारी 9 हजार 895 नवीन कोरोना रुग्ण, 298 मृत्यू

राजस्थान

  • जयपूर - राजस्थानच्या जोधपूरमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला प्रसिद्ध झालेले भिलवाडा मॉडेलही जोधपूरमधील रुग्णसंख्येवर आळा घालू शकले नाही. त्यामुळे आता स्थानिक प्रशासन, पुढारी आणि नेत्यांच्या मदतीने तिथे रामगंज मॉडेल राबवण्याचा विचार सरकार करत आहे.

दरम्यान, राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार टॉसिलिझुमॅब हे औषध सध्या रुग्णांवर गुणकारी ठरत असून त्याचा वापर उपचारासाठी करण्यात येणार आहे.

मध्य प्रदेश

  • भोपाळ - कोरोना आणि पूरपरिस्थिती लक्षात घेता, राज्य निवडणूक आयोगाने २७ जागांवरील निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आल्यानंतर तातडीने निवडणुका घेण्यात येतील.

राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री अरविंद भदोरिया यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वी त्यांनी एका बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीमध्ये हरदीप सिंह डांग आणि ओपी सक्लेचा हेदेखील उपस्थित होते.

यासोबतच, भदोरिया यांनी लालजी टंडन यांच्या अंत्यविधीलाही हजेरी लावली होती. तसेच, अंत्यविधीला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि इतर मंत्र्यांनीही हजेरी लावली होती.

दिल्ली

  • नवी दिल्ली - शहरात आज १ हजार ०४१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख २७ हजार ३६४वर पोहोचली आहे. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये नोंद झालेल्या २६ बळींनंतर, एकूण कोरोना बळींची संख्या ३ हजार ७४५ वर पोहोचली आहे.

दिल्लीत सध्या १४ हजार ५५४ अ‌ॅक्टिव रुग्ण आहेत.

बिहार

  • पाटणा - जनता दल (युनायटेड) चे नेते बिंदी यादव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जदयूच्या आमदार मनोरमा देवी यांचे ते पती होते.

राज्यात आतापर्यंत ३० हजार ३६९ रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी १० हजार ५०६ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत एकूण २१७ रुग्णांचा बळी गेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.