हैदराबाद - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासांत देशात सर्वाधिक 28 हजार 637 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांची एकुण संख्या 8 लाख 49 हजार 553 इतक झाला आहे. मागील नऊ दिवसांपासून बाधितांचा आकडा 22 हजारांचा टप्पा पार करत आहे. देशात रविवारपर्यंत (दि. 12 जुलै) देशात 22 हजार 674 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- महाराष्ट्र
रविवारी (दि. 12 जुलै) महाराष्ट्र राज्यात 7 हजार 827 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या राज्यात 1 लाख 3 हजार 516 सक्रीय (अॅक्टीव्ह) रुग्णांवर राज्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. रविवारी राज्यात 3 हजार 340 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारपर्यंत एकुण 1 लाख 40 हजार 325 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
- दिल्ली
दिल्ली राज्या मागील 24 तासांत 1 हजार 573 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. रविवारपर्यंत दिल्लीतील बाधितांची एकुण संख्या 1लाख 12 हजार 494 इतकी झाली आहे.
- राजस्थान
जोधपूरच्या करवड पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला व एका पोलीस शिपायाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यातील 39 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेतली असता सर्वांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. - मध्यप्रदेश
मध्य प्रदेशात कोरोनाच्या वाढत्या आकड्याचा विचार करता रविवारी (दि. 12 जुलै) एकदिवसीय लॉकडाऊन करण्यात आले होते. तरिही मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे 106, ग्वालियर येथे 111, मुरैनामध्ये 101 तर इंदूरमध्यें 89 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. रविवारपर्यंत मध्यप्रदेशात एकुण बाधितांची संख्या 17 हजार इतकी झाली आहे. राज्यात में आठवड्यासाठी टाळेबंदी जाहीर होण्याची शक्यता आहे.
- तेलंगणा
तेलंगणा येथील राजभवनात 28 पुलिसांना, 10 कर्मचाऱ्यांना व त्यांच्या परिवारातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यपाल तमिलिसै सौंदरराजन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
तेलंगणामध्ये रविवारी (दि. 12 जुलै) 1 हजार 269 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा एकुण आकडा 34 हजार 671 वर पोहोचला आहे. तर 22 हजार 482 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 11 हजार 883 सक्रीय (अॅक्टीव्ह) रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. तेलंगणात रविवारपर्यंत 356 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.