हैदराबाद - देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 130 कोटी जनसंख्या भारतात कोरोनाचा अटकाव करण्याचा चांगले प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. देशात शुक्रवारी (दि. 10 जुलै) 26 हजार 506 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा एकूण आकडा 7 लाख 93 हजार 802 इतका झाला आहे. तर शुक्रवारपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 21 हजार 604 इतकी झाली आहे.
- महाराष्ट्र
राज्यात शुक्रवारी (दि. 10 जुलै) 7 हजार 862 नव्या कोरोनाबाधित कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 226 रुग्णांचा कोरोनामुळे शुक्रावारी (दि. 10 जुलै) मृत्यू झाला आहे. शुक्रवारपर्यंत बाधितांची एकूण संख्या 2 लाख 38 हजार 461 इतकी झाली आहे. शुक्रावरी 5 हजार 366 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. शुक्रवारपर्यंत 1 लाख 32 हजार 625 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. राज्यात सध्या 95 हजार 647 सक्रिय (अॅक्टिव्ह) रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
- दिल्ली
दिल्लीत मगील 24 तासांत 2 हजार 89 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 42 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारपर्यंत दिल्लीतील एकूण बाधितांचा 1 लाख 9 हजार 640 वर पोहोचला आहे. शुक्रावरी 2 हजार 468 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 84 हजार 694 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
- कर्नाटक
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांच्या बंगळुरु स्थित शासकीय निवास्थान कृष्णामधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे शुक्रवारी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्वतःला होमक्वारंटाइन केले आहे. दरम्यान, ते म्हणाले की, मी स्वस्थ असून खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःला होम क्वारंटाइन करुन घेतले. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसच्या माध्यमातून राज्यातील मंत्री, आमदारांची बैठक घेतली व राज्यात नियमांची सक्ती करत सर्वांना मास्क वापरणे सक्ती केले असून सामाजिक अंतर पाळण्याबाबत सुचना केल्या आहेत.
- गुजरात - सूरतमध्ये एका हिरे व्यापाऱ्याने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली. त्या 63 वर्षीय हिरे व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तो तणावात गेला होता. त्याच तणावात त्याने आत्महत्या केली आहे. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात त्याने लिहिने आहे की, कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो मोठ्या तणावात गेला आहे. यामुळे त्याने आत्महत्या केली.
- झारखंड
झारखंड राज्यातील साहिबगंजच्या सकरोगड येथे राहणारी 99 वर्षीय महिलेना कोरोनावर मात केली आहे. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. सलग दोन वेळा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने डॉक्टारांनी त्यांचे सत्कार करुन त्यांना रुग्णालयात मुक्त केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते त्या वृद्ध महिलेला उच्च रक्तदाब व मधुमेह नसल्याने त्या महिलेने उपचारास उत्तम प्रतिसाद दिला आहे. - ओडिशा
ओडिशामध्ये शुक्रवारी (दि. 10 जुलै) 565 रुग्ण कोरोनागमुक्त झाले आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत 7 हजार 972 शुक्रवारपर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.